नियमबाह्यरीत्या कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:04 IST2021-04-13T04:04:21+5:302021-04-13T04:04:21+5:30
डाॅ.गणेश अग्रवाल यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. मात्र, तरीही ते नियमबाह्यरीत्या रुग्णांवर उपचार करीत ...

नियमबाह्यरीत्या कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल
डाॅ.गणेश अग्रवाल यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. मात्र, तरीही ते नियमबाह्यरीत्या रुग्णांवर उपचार करीत होते, तसेच सर्वसाधारण रुग्णांनाही कोरोना नसताना कोरोना झाल्याचे सांगून आर्थिक लूट करीत होते. रुग्णालयात कुठलाही विलगीकरण कक्ष नसताना, सर्व रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार करून, कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत होते, तसेच पदवी नसताना, ती फलकावर टाकून रुग्णांची दिशाभूल करीत होते. या प्रकरणी काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर, तहसीलदार राहुल गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे यांच्या पथकाने या हाॅस्पिटलवर छापा टाकून तपासणी केली होती. त्यावेळी त्यांना आरोप करण्यात आलेल्या सर्व बाबी आढळल्यानंतर डॉ.गणेश अग्रवाल यांना आरोग्य विभागाने नोटीस बजावली होती. परवानगी न घेता, कोरोना रुग्णांवर उपचार करणे, गंभीर असा कोरोना आजार फैलावण्यास कारणीभूत ठरणे व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन टारपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ.गणेश अग्रवाल यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.सम्राटसिंग राजपूत हे करीत आहेत.