रस्त्याच्या कामावरून दोन गटांत हाणामारी (टिप- बातमीत एक नाव बोल्ड केलेलं आहे, कृपया पाहणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:04 IST2021-04-13T04:04:16+5:302021-04-13T04:04:16+5:30
बोरगाव बाजार/ सिल्लोड : तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथे सिमेंट रस्त्याच्या कामावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी ...

रस्त्याच्या कामावरून दोन गटांत हाणामारी (टिप- बातमीत एक नाव बोल्ड केलेलं आहे, कृपया पाहणे.)
बोरगाव बाजार/ सिल्लोड : तालुक्यातील बोरगाव सारवाणी येथे सिमेंट रस्त्याच्या कामावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, १८ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेपासून ते फिरोज पठाण यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आक्षेप येथील नागरिक शेख इसरार बशीर पठाण यांनी घेतला होता. यामुळे येथील पं.स. सदस्य सत्तार बागवान यांनी ११ एप्रिल रोजी याबाबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मीटिंग बोलावली होती. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास चर्चा सुरू असताना, ग्रा.पं. सदस्य शेख शफी शेख ईसा व इसरार बशीर खान पठाण या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला जाऊन दोन गट आमणे सामने येऊन लाठी, काठीने तुंबळ हाणामारी झाली. यात अनेक जण जखमी झाले, तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्ची, टेबल व इतर साहित्याचीही मोडतोड करण्यात आली. या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये इसरार बशीर खान पठाण, अमजत नजीर पठाण, शेख इमरान शेख निसार, यायाखा बशीर पठाण, जाकेर बशीर पठाण, उमर बशीर पठाण, इमरान बशीर पठाण, कलीम बिस्मिल्ला खा पठाण, मोसिन युसुफ पठाण, शेख शफी शेख ईसा, शेख समीर शेख इसा, शेख जमीर शेख शफीक, मुजाहिद शब्बीर शेख, रऊफ रफिक शेख, इरफान हुसेन शेख, असिफ नवाब शेख, रशीद गफुर शेख, मुनाफ इसा शेख यांचा समावेश आहे.
चौकट
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरही भिडले
बोरगाव सारवणी येथे रविवारी सकाळी दोन गटांत हाणामारी झाल्यानंतर, दोन्ही गटांतील लोक सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर परस्पर तक्रारी देण्यासाठी जमले होते. मात्र, येथे आल्यानंतर पुन्हा वाद उफाळला व पोलीस ठाण्याच्या आवारातच विटा, दगडांनी फिल्मी स्टाईल हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी तत्काळ गोंधळ घालणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी मुश्ताक युसुफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री विविध कलमांखाली १४ जणांसह इतर पंधरा अशा २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.राजेंद्र बोकडे करीत आहेत.