पन्नास टक्के संस्थांना लागले टाळे !
By Admin | Updated: September 26, 2014 01:24 IST2014-09-26T01:08:22+5:302014-09-26T01:24:43+5:30
उमरगा : सहकारी कायद्याचे उल्लंघन करुन अटींची पूर्तता न केलेल्या तालुक्यातील एकूण २८० विविध सहकारी संस्थापैकी १४१ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.

पन्नास टक्के संस्थांना लागले टाळे !
उमरगा : सहकारी कायद्याचे उल्लंघन करुन अटींची पूर्तता न केलेल्या तालुक्यातील एकूण २८० विविध सहकारी संस्थापैकी १४१ सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळानंतर तालुक्यात सहकार क्षेत्राचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. शेती सहकार, नागरी सहकारी बँका, पगारदार पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था, तालुका खरेदी विक्री संघ, पीक पणन, सहकारी साखर कारखाने, सामुदायिक शेती संस्था, यंत्रमाग वस्त्रोद्योग बांधकाम, माल उत्पादक संघ, बलुतेदार संघ, सुतगिरणी ग्राहक भांडार, गृहनिर्माण संस्था, वाहतूक सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, पाणी पुरवठा, पाणी वापर, संवर्गीकरण इत्यादी एकूण २२४ सहकारी संस्थांनी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे नोंदणी केली होती.
नोंदणी केलेल्या बहुतांश सहकारी संस्था या नोंदणीनंतर कागदावरच राहिल्या आहेत. ज्या संस्थांना सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालयाच्या वतीने अनेकवेळा घालून दिलेल्या सहकारी कायद्यांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. यातील ७५ विविध सहकारी संस्थांनी लेखा परीक्षण अहवाल, दोष दुरुस्ती अहवाल, वार्षिक सर्वसाधारण सभा, निवडणूक प्रतिज्ञा पत्र, आॅनलाईन माहिती भरुन देणे इत्यादी कार्यालयीन नियमांची पूर्तता केली नसल्याने आशा या सहकारी संस्थांना सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये सहाय्यक निबंधक एस.एस. कुलकर्णी यांनी अंतरिम आदेश देवून अवसायनात काढल्या आहेत. कल्लेश्वर ग्रामीण बिगर शेती कसगी, शिवप्रताप कुन्हाळी, हुतात्मा वेदप्रकाश गुंजोटी, संजय सोलंकर बलसूर, श्रमकैवारी तुरोरी, महालिंगरायवाडी, धनवर्षा, माडज, राजहंस तलमोड या आठ ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था, प्रियदर्शना नागरी उमरगा, मुरुम, अभय उमरगा, जयश्री महिला उमरगा, छत्रपती शिवाजी उमरगा, महादेव उमरगा या नागरी पतसंस्थांचा समावेश आहे. उमरगा तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ, यशवंत वीट उत्पादक मुरुम, जटाशंकर वीट उत्पादक, यशोनिल औद्योगिक उमरगा, साई निरा ताडगुळ उत्पादक उमरगा, ज्ञानेश्वर सह उपसा जलसिंचन, तुरोरी, बालाजी पाणीपुरवठा कराळी, सिद्धनाथ धनलक्ष्मी पाणी वापर बेडगा, जय हनुमान पाणी वापर येळी, व्यंकटेश पाणी वापर, अमृततुल्य पाणी वावर चिंचोली, श्री जय हनुमान शेती विकास पाणी वापर मातोळा, बळीराजा पाणी वापर मळगी, भटके विमुक्त ग्राहक भांडार उमरगा, बिजडोर उत्पादक मुरुम, विकास ग्राहक भांडार उमरगा, निळकंठेश्वर सहकारी गृहनिर्माण बलसूर, डिसीसी बँक कर्मचारी गृहतारण संस्था उमरगा, जटाशंकर स्वयंरोजगार मुळज, प्रदीप रंगकाम कामगार मुळज, श्रद्धा स्वयंरोजगार उमरगा, कल्पवृक्ष बहुउद्देशीय स्वयंरोजगार आलूर, गणेश बहुउद्देशीय स्वयंरोजगार आलूर, हनुमान स्वयंरोजगार मातोळा, राजश्री शाहु महाराज स्वयंरोजगार गुंजोटी, लोकसेवा स्वयंरोजगार नारंगवाडी, माऊली स्वयंरोजगार सावळसूर आदीसह ७५ विविध सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
अवसायनात काढण्यात आलेल्या विविध सहकारी संस्थानी वार्षिक अहवाल, लेखा परिक्षणे, वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती, आॅन लाईन माहिती, निवडणुका याबाबतची माहिती येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाला सादर केली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये सदरील संस्था अवसायनात काढण्यात आल्याचे सहाय्यक निबंधक संजय कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)
तालुक्यातील ६६ सहकारी दूध व्यवसाय संस्थांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९ व नियम १९६१ अन्वये संस्थेची आर्थिक पत्रके सादर न करणे, वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे, लेखा परिक्षण अहवाल सादर न करणे, दोष दुरुस्ती अहवाल कार्यालयाकडे मुदतीत न पाठविल्यामुळे तालुक्यातील ६६ दुग्ध सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. यात आदर्श (कवठा), जटाशंकर (मुळज), आम्रपाली (गुंजोटी), सेवालाल (बेळंब), शिवयोगी (आलूर), श्रीकृष्ण (कोराळ), जयराम (नारंगवाडी), कामधेनू (कोरेगाव), राजहंस (त्रिकोळी), जयभवानी (भगतवाडी), धाकटीवाडी, अंबिका (बाबळसूर), शरद कलदेव (निंबाळा), कपिला (कोरेगाव), लक्ष्मी (कोरेगाववाडी), मारुती (एकुरगा), रामलिंगेश्वर (येळी), हनुमान (पळसगाव), श्रीराम (मुळज), बालाजी (कराळी), समर्थ (दाबका), शिवामृत (दाळींब), महादेव (काळनिंबाळा), अहिल्यादेवी होळकर (मुळज), श्रीराम (गुगळगाव), सिद्धेश्वर (बलसूर), भागीरथी (मातोळा), विष्णुकृपा (कवठा), कुलस्वामीनी (नारंगवाडी), कपिलधारा (मुरुम), शिवनेरी (सावळसूर), कपिला (बलसूर), गिरीजा (कराळी), आदर्श (कोळेवाडी), रुक्मिणी (येणेगूर), इंदिरा (जकेकूर), अश्विनी (नारंगवाडी), कुलस्वामीनी (बोरी), प्रियदर्शनी (कदेर), व्यंकटेश (कराळी), विजयलक्ष्मी (तुरोरी), प्रगती (तुरोरी), सरस्वती (उमरगा), राऊबाई (त्रिकोळी), शिवनेरी (एकुरगावाडी), तुळजाभवानी (एकुरगावाडी), शिवनेरी (मातोळा), विठाई (दाबका), महानंद (माडज), गिरीजा (कवठा), अंजनाबाई (कदेर), पांडूरंग (मुळज), साईकृपा (मुळज), तुळजाई (एकुरगा), कै. जगन्नाथ दासिमे (चिंचोली भुयार), तिरुपती (जकेकूर), शिवनेरी (आष्टा), शिवशक्ती (कुन्हाळी), महालक्ष्मी (जकेकूर), सिद्धनाथ (गुरुवाडी) या सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थांचा समावेश आहे.