गंगापुरात पाचव्या दिवशी रुग्णवाढीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:06 IST2021-04-22T04:06:01+5:302021-04-22T04:06:01+5:30

गंगापूर : सलग चार दिवसांपासून शंभर पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यानंतर पाचव्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. बुधवार (दि. ...

On the fifth day in Gangapur, there was a break | गंगापुरात पाचव्या दिवशी रुग्णवाढीला ब्रेक

गंगापुरात पाचव्या दिवशी रुग्णवाढीला ब्रेक

गंगापूर : सलग चार दिवसांपासून शंभर पेक्षा जास्त रुग्ण सापडल्यानंतर पाचव्या दिवशी रुग्ण वाढीला ब्रेक लागला आहे. बुधवार (दि. २१) दिवसभरात ४७ रुग्ण आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे मात्र, मर्यादित लसीचा साठा मिळत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालुक्याला कोरोनाने विळखा घातल्याने रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. १७ ते २० एप्रिल या चार दिवसांच्या दरम्यान १५४, ११०, १२२, १११ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये गंगापूर शहरापेक्षा ग्रामीण भागाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग चार दिवस विक्रमी वेगाने वाढणाऱ्या रुग्ण संख्येला बुधवारी (दि. २१) ४७ रुग्ण सापडल्याने ब्रेक लागला आहे. यामध्ये सर्वाधिक लासूर स्टेशन : ८, गणेशवाडी : ६ रुग्णांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे गंगापूर शहरात सोमवारी (दि. १९) तीन व बुधवारी देखील तीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरात काहीअंशी दिलासा मिळाला आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी होत असल्यानेच कोरोना आटोक्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

केवळ १८८ जणांना लस

गंगापूर तालुक्यात बुधवारी (दि. २१) केवळ १८८ जणांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी नागरिकांचा हळूहळू प्रतिसाद मिळत असून, लसचे डोस मर्यादित प्रमाणात मिळत असल्याने लसीकरणाचा वेग मंदावत आहे.

Web Title: On the fifth day in Gangapur, there was a break