पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: June 27, 2017 01:04 IST2017-06-27T01:02:52+5:302017-06-27T01:04:56+5:30
औरंगाबाद : खेळून घरी आलेल्या १५ वर्षीय मुलाचा राहत्या घरी चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला.

पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खेळून घरी आलेल्या १५ वर्षीय मुलाचा राहत्या घरी चक्कर येऊन पडल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना भीमनगर, भावसिंगपुरा येथे सोमवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली. सुमेध नवनाथ तेजाड (१५), असे मृत मुलाचे नाव आहे.
सुमेध सोमवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता. साडेचार-पावणेपाच वाजेच्या सुमारास तो घरी आला. यावेळी अचानक तो चक्कर येऊन खाली कोसळला. बेशुद्धावस्थेत वडिलांनी त्यास तात्काळ घाटीत दाखल केले. तेथील डॉक्टरांनी सुमेध यास तपासून ५.३५ वाजेच्या सुमारास मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.