भरधाव डम्परने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:21 IST2017-12-01T01:21:44+5:302017-12-01T01:21:48+5:30
वाहतूक सिग्नल ग्रीन होताच सुसाट निघालेल्या डांबराच्या डम्पर ट्रकने मोपेडस्वार निवृत्त नायब तहसीलदाराला चिरडले. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हर्सूल टी पॉइंट चौकात झाला. या अपघाताचे भयावह चित्र पाहताना अनेकांचा थरकाप उडाला. मधुकर पंडितराव कुलकर्णी (६०, रा. भगतसिंगनगर) असे मृताचे नाव आहे.

भरधाव डम्परने चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वाहतूक सिग्नल ग्रीन होताच सुसाट निघालेल्या डांबराच्या डम्पर ट्रकने मोपेडस्वार निवृत्त नायब तहसीलदाराला चिरडले. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हर्सूल टी पॉइंट चौकात झाला. या अपघाताचे भयावह चित्र पाहताना अनेकांचा थरकाप उडाला.
मधुकर पंडितराव कुलकर्णी (६०, रा. भगतसिंगनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मधुकर कुलकर्णी हे दोन वर्षांपूर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहेत. ते गुरुवारी दुपारी गावी जाणाºया नातेवाईकांना सोडण्यासाठी हर्सूल टी पॉइंट येथे आले. नातेवाईकांना बसमध्ये बसून दिल्यानंतर ते मोपेडवर (क्रमांक एमएच-२० बीआर ४३६०) बसून मयूर पार्ककडे रस्ता ओलांडून जात होते. यावेळी सिडको बसस्थानकाकडून हर्सूल गावाच्या दिशेने सुसाट निघालेल्या हायवा डम्परने (क्रमांक एमएच-२० एटी ४९३) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्यांचा मेंदू बाहेर पडला आणि ते घटनास्थळीच ठार झाले. ट्रकखाली रक्ताचे थारोळे आणि मेंदू पडलेला पाहून प्रत्यक्षदर्शींच्या अंगाचा थरकाप उडत होता.
अपघात घडताच चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी तेथे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी घटनेची माहिती हर्सूल आणि सिटीचौक पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि हर्सूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्त आणि मांसावर माती टाकली.