शेतीच्या वादातून बेदम मारहाण
By Admin | Updated: May 7, 2014 23:56 IST2014-05-07T23:54:36+5:302014-05-07T23:56:09+5:30
अंबड : शेतीचा बांध का पेटवून दिला म्हणून विचारपूस करण्यास गेलेल्या एका ४० वर्षीय इसमास चौघा जणांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्

शेतीच्या वादातून बेदम मारहाण
अंबड : शेतीचा बांध का पेटवून दिला म्हणून विचारपूस करण्यास गेलेल्या एका ४० वर्षीय इसमास चौघा जणांनी लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि.२ मे रोजी दु.४ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडीलासुरा शिवारात घडली. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील वडीलासुरा येथील नाथा चंद्रभान सावंत वय (४० वर्षे) यांच्या शेतीच्या बाजूस शेती असलेले नवनाथ उद्धव शेंडगे, गणेश रमेश शेंडगे, उद्धव तुळशीराम शेंडगे व रमेश तुळशीराम शेंडगे आदींना तुम्ही माझ्या शेतीचा बांध का पेटवून दिला? असे विचारण्यास गेले असता नवनाथ शेंडगे यांनी नाथा सावंत यास कपाशीच्या पºहाट्या उपटण्याच्या चिमट्याने डोक्यात मारून डोके फोडले. अन्य तिघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नाथा सावंती यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात वरील चौघांविरूद्ध कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंविअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ या प्रकरणी बीट जमादारांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर नाथा सावंत यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. पोलिस अधीक्षकांनी दखल घेताच अंबड पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)