ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; वाहनांचा चुराडा

By Admin | Updated: June 27, 2016 01:04 IST2016-06-27T00:34:21+5:302016-06-27T01:04:56+5:30

लासूर-स्टेशन : नागपूर-मुंबई महामार्गावरील आरापूर शिवारात सकाळी ६.१५ वाजता झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की,

Fierce accidents of truck-travels; Steal the vehicles | ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; वाहनांचा चुराडा

ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; वाहनांचा चुराडा


लासूर-स्टेशन : नागपूर-मुंबई महामार्गावरील आरापूर शिवारात सकाळी ६.१५ वाजता झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली होती.
पोलिसांनी सांगितले की, लासूर स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या आरापूर शिवारात सकाळी ६.१५ वाजता ट्रॅव्हल्स (क्र. एम. एच. 04. जी. ८८५२) मुंबई येथून नागपूर-मुंबई महामार्गाने औरंगाबादकडे येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकवर (क्र. सी. जी. ०७.ए. झेड. ७०७९) धडकली. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक, ट्रक चालकासह एकूण १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.
या अपघातामुळे नागपूर-मुंबई महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. विशेष म्हणजे या भीषण अपघातातील दोन्ही वाहने बाजूला करण्यासाठी जेसीबी, तसेच पोकलेनला पाचारण करण्यात आले होते. यादरम्यान महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर तब्बल ६ तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही वाहने रस्त्यातून बाजूला करण्यात आली. यानंतर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. यासाठी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अपघातातील जखमी
शेख मोहंमद शेख जलालुद्दीन (ट्रॅव्हल्स चालक), जुगरासिंग लखविंदरसिंग (ट्रकचालक), साहेबराव सर्जेराव गंजारे (४०), नानासाहेब राजाराम सोनवणे (४७), लक्ष्मण कचरू दहीहंडे (५५), अश्विन काळे (३०), जलाल नूर शेख (४०), बाबर मुन्शी शेख (३०), गोहर आलम (३०), अश्पाक इस्माईल शेख (२५).
बोरदहेगाव : नागपूर-मुंबई महामार्गावरील बेंदवाडी फाट्याजवळ खाजगी बस उलटली; मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. ही घटना दुपारी १२ वाजता घडली. ही बस उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास खोळंबली होती. याची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पोनि. नांदेडकर, उपनिरीक्षक जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Fierce accidents of truck-travels; Steal the vehicles