बस-टमटमचा भीषण अपघात; तिघे ठार
By Admin | Updated: November 16, 2015 00:38 IST2015-11-15T23:57:16+5:302015-11-16T00:38:12+5:30
उमरगा : भरधाव वेगातील टमटम व खासगी बसची समोरासमोर भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ तर दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले़

बस-टमटमचा भीषण अपघात; तिघे ठार
उमरगा : भरधाव वेगातील टमटम व खासगी बसची समोरासमोर भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ तर दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले़ हा अपघात शनिवारी रात्रीच्या सुमारास उमरगा शहरा नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावरील भगिरथ धाब्याजवळ घडला़ याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा येथे प्रवासी भरून टमटम (क्ऱएम़एच़२५- एऩ७८२) हा कराळी गावाकडे जात होता़ हा टमटम राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा शहरानजीकच्या भगिरथ धाब्याजवळ आला असता हैद्राबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी बसने (क्रक़े़ए़३९- ७५३६) जोराची धडक दिली़ या भीषण अपघातात टमटममधील बाळू शिंदे (वय-३० राक़राळी), सचिन सूर्यवंशी (वय-२५ रा तुरोरी) हे दोघे जागीच ठार झाले तर राघवेंद्र जाधव (वय-२५ रा़तुरोरी ता़उमरगा) यांचा सोलापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या अपघातात अमोल चव्हाण (वय-३० राग़ुंजोटी), मयंक बिराजदार (रा़उमरगा) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, जखमींवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ अपघातानंतर बसचालक फरार झाला़
उमरगा : भरधाव वेगातील जीपने जोराची धडक दिल्याने रस्ता ओलांडणाऱ्या सात वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास येळी (ता़उमरगा) नजीक राष्ट्रीय महामार्गावर घडला असून, या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील पांडुरंग कमलाकर पाटील हे शुक्रवारी त्यांच्या पत्नी व मुलगी समृध्दी (वय-०७) यांच्यासह येळीपासून जवळच असलेल्या भुयार चिंचोली या आपल्या सासूरवाडीला निघाले होते़ बसमधून ते येळी गावाजवळ उतरल्यानंतर त्यांची मुलगी समृध्दी ही भाऊसाहेब बिराजदार विद्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होती़ त्यावेळी सोलापूरहून उमरगा शहराकडे भरधाव वेगात जाणाऱ्या जीपने (क्ऱएम़एच़१२- एफ़एच़५५५) समृध्दी हिला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या समृध्दीचा जागीच मृत्यू झाला़ आपल्या आजोळी आजी-आजोबा, मामांना भेटण्यासाठी निघालेल्या समृध्दीचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ याबाबत पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीपचालकाविरूध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास सपोफौ बापू कांबळे हे करीत आहेत़