शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांकडून कुणबी समाजाची क्षेत्रपाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 18:44 IST

इनकॅमेरा केली कागदपत्रांची पाहणी; गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली.

पैठण: तुमची जात कोणती? उपजिविकेचे साधन काय? कोणत्या देवाची भक्ती करता? तुमचे नातेगोते कुठले आहे? तुमच्या टीसीवर कुणबी अशी नोंद आहे का? असे अनेक प्रश्न पैठण तालुक्यात दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी विचारत वाईदेशी कुणबी समाजाची आज क्षेत्रपाहणी केली. कुणबी नोंद असलेले कागदपत्रे पुरावे म्हणून सादर करा पुढे याच कागदपत्राच्या आधारे शासनाकडे पाठपुरावा करता येईल अशी भूमिका मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी गावात घेतलेल्या ग्रामस्था समोर मांडली.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांनी  पैठणसह तालुक्यातील, सोनवाडी, नानेगाव व एकतुणी गावाचा आज दौरा केला. गावातील रहिवासी असलेल्या वाईदेशी कुणबी मराठा समाजाशी चर्चा करून क्षेत्रपाहणी केली. यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण, गटविकास अधिकारी उषा मोरे, मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे, ग्रामसेवक प्रशांत पाटील, तलाठी लक्ष्मीकांत गोजरे आदी उपस्थित होते. पैठण शहरातील कुणबी समाजाच्या नागरिकांशी चर्चा करून आयोगाच्या सदस्यांनी तालुक्यातील सोनवाडी गावास भेट दिली. यावेळी वाईदेशी कुनबी मराठा समाजातील अनिरुद्ध नवले, दामोधर नवले, ज्ञानेश्वर नवले, तात्याराव टकले यांच्या घरी थेट जाऊन आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) यांनी  घराची पाहणी केली.

कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून आर्थिक, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक माहिती घेतली. यानंतर आयोगाच्या सदस्या निलिमा सरप यांच्या  उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालया समोर इनकॅमेरा बैठक घेण्यात आली. यावेळी टिसीवर कुणबी मराठा नोंद असेल व तुमचे इतर ठिकाणी कुणबी मराठा समाजाचे नातेवाईक असतील तर त्यांचे पुरावे ग्रामपंचायत कार्यालयात दिलेल्या आयोगाच्या  फाॅर्म मध्ये भरून द्या, हे पुरावे ग्रामपंचायत तहसील कार्यालय जमा करतील. पुढे या पुराव्यानिशी वायंदेशी कुणबी मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांचा पाठपुरावा करता येईल, असे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य निलिमा सरप यांनी सांगितले. यावेळी बळिराम नवले, सुनिल नवले, दामोधर नवले, जगन्नाथ दुधे,ज्ञानेश्वर आल्हाट, बाळासाहेब माने, सर्जेराव गुंजाळ, गणेश नवले आदी उपस्थित होते.  यानंतर नानेगाव ता पैठण येथे मंगळवारी दुपारी आडीज वाजता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यासह पथक दाखल झाले. गावातील  धोंडिराम माने, सोमनाथ चिकणे,केशव घाडगे,लक्ष्मण माने, रामभाऊ मगर यांच्या घरांची इनकॅमेरा पाहणी करण्यात आली. 

अशी केली क्षेत्रपाहणी यावेळी कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करताना तुमचे कुलदैवत कोणते आहे?, तुमचे घरातील देव्हारे कुठे आहे?,  तुमचा देव कोणता?, तुमची जात कोणती ?, तुम्हाला जमीन किती आहे ?,  तुमचे नातेवाईक कुठे कुठे राहतात ? आदी प्रश्न विचारण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालया समोर बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद  शाळेतील वाईदेशी कुणबी समाजाचे प्रवेश निर्गम उतारे इनकॅमेरा पाहण्यात आले. यावेळी बाळासाहेब माने,गणपराव माने, रामेश्वर बोधने,केदार माने,भारत रुपेकर,सुदाम माने,दिपक शिर्के, अनिल बोधने, सोमनाथ चिकणे,केशव घाडगे, रमेश बोधने, भागिरथ बोधने, तुकाराम बोधने, पोलिस पाटील संतोष बोधने,बाजीराव मगर,बाप्पु मगर,ज्ञानेश्वर मगर आदी  ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद