जालना शहरात धान्य महोत्सव
By Admin | Updated: April 14, 2017 00:57 IST2017-04-14T00:53:34+5:302017-04-14T00:57:44+5:30
जालना :१५ ते १७ एप्रिल या काळात शिवार धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना शहरात धान्य महोत्सव
जालना : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला दर्जेदार शेतमाल कुठल्याही मध्यस्ताशिवाय ग्राहकांपर्यत पोहचिवण्यााठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन-आत्मा आणि कृषी विभागाच्या वतीने १५ ते १७ एप्रिल या काळात शिवार धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, जालना जिल्ह्यात गटशेतीला मोठे यश मिळाल्याचे सांगत एकूण दोन हजार ७०० गटांच्या माध्यमातून ही शेती केली जाते. यात आता शेतकरी उत्पादक दहा कंपन्यांचाही समावेश राहणार आहे. शहरातील शिवाजी पुतळा परिसरातील गुरूगणेश भवनमध्ये जवळपास ५० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. अन्नधान्यासह ताजे मोसंबी, द्राक्ष, संत्रा, टरबूज, सेंद्रीय गहू आदींचे स्टॉल राहणार आहेत.
या महोत्सवात गहू ८७० क्विंटल, ज्वारी २०० क्विंटल, बाजरी २५ क्विंटल, तूरडाळ १५४ क्विंटल, हरभरा, मूगदाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, तीळ, मिरची पावडर, हळद, अद्रक आदी वस्तू या शिवार महोत्सवात नागरिकांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आत्माचे संचालक संतोश आळशे यांनी दिली. या महोत्सवातून शेतकऱ्यांना थेट रास्तभाव मिळावा या हेतूने हा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)