दरवाढीमुळे बियाणांआधी खतांची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:05 IST2021-05-18T04:05:37+5:302021-05-18T04:05:37+5:30
सोयगाव : खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झालेला आहे. त्यातच आधी बियाणे खरेदी करण्याआधी दरवाढीमुळे ...

दरवाढीमुळे बियाणांआधी खतांची जुळवाजुळव
सोयगाव : खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झालेला आहे. त्यातच आधी बियाणे खरेदी करण्याआधी दरवाढीमुळे खतांची जुळवाजुळव करण्यात शेतकऱ्याची घालमेल सुरू झाली आहे. खत दरवाढीचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
शासनाने यंदाच्या खरीप हंगामात बियाण्यांच्या विक्रीसाठी १ जूनचे निर्बंध घालून दिले आहेत. त्यात तालुक्यातील शेतकरी बियाण्यांच्या आधीच रासायनिक खतांची जुळवाजुळव करण्यासाठी पुढे आला आहे. हा परिणाम भाववाढीचा असून शेतकरी हंगाम सुरू होण्यापूर्वीच चिंतेत पडला आहे. तालुक्यात खरिपाच्या पेरण्यायोग्य ४३ हेक्टर क्षेत्र आहे. पावसाचे आगमन मिरगातच झाले तर तालुक्यात शंभर टक्के पेरण्या होण्याची शक्यता तालुका कृषी विभागाने वर्तविली आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज मिळेना
खरिपाच्या पेरण्यांसाठी नवीन सभासद असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकांनी अद्यापही पीक कर्ज देण्यासाठी हात घातलेला नाही. नवीन सभासद शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्याजाच्या रकमेवर शेती पेरण्याची वेळ येणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.