कुंपणाने केला घात, शाळकरी मुलाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 15:25 IST2017-07-21T15:25:01+5:302017-07-21T15:25:01+5:30

अहमदपूर तालुक्यातील धानोरा(बु) येथील शिवारात ऊसाच्या शेताला घातलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणास हात लागल्याने अजय जोंधळे या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा सकाळी दहाच्या सुमारास मृत्यु झाला

By the fencing, the schoolboy's death by electric shock | कुंपणाने केला घात, शाळकरी मुलाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

कुंपणाने केला घात, शाळकरी मुलाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

ऑनलाईन लोकमत

लातूर : अहमदपूर तालुक्यातील धानोरा(बु) येथील शिवारात ऊसाच्या शेताला घातलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणास हात लागल्याने अजय जोंधळे या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा सकाळी दहाच्या सुमारास मृत्यु झाला. 

धानोरा येथील अजय जोंधळे हा वसंत विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. अजय सकाळी शेळीला चारा आणण्यासाठी गावाशेजारी असलेल्या शेतात गेला होता. तेथे असलेल्या ऊसाच्या शेतीस शेतक-यांनी  रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी चहुबाजूनी तारेचे विद्युत प्रवाहित कुंपण घातले आहे. चारा काढत असताना अजयचा या कुंपणास हात लागल्याने त्याला तीव्र विद्युत धक्का बसून तो तेथेच कोसळला. अजयला घरी परत येण्यास उशीर होत असल्याने  अजयची आई त्यास पाहण्यासाठी आली असता तिला अजय तेथे पडलेला दिसला. यानंतर त्याला तात्काळ किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

Web Title: By the fencing, the schoolboy's death by electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.