शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात महिला निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून शिवीगाळ

By संतोष हिरेमठ | Updated: May 17, 2024 12:00 IST

मध्यरात्री झालेल्या या घटनेनंतर अपघात विभागातील रुग्णसेवा निवासी डॉक्टरांनी बंद ठेवली

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ करण्याचा प्रकार झाला. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी अपघात विभागातील रुग्णसेवा थांबवली. तब्बल दोन तासानंतर अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर निवासी डॉक्टरांनी पुन्हा रुग्णसेवा सुरू केली.

अपघात विभागात रात्री एक वाजेच्या सुमारास एक महिला रुग्ण आली. अपघात विभागात रुग्णांची गर्दी असल्याने सदर महिलेची तपासणी करण्यास काहीसा उशीर झाला. मात्र, या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर होती.  यावरून दहा ते पंधरा नातेवाईकांनी महिला निवासी डॉक्टरला शिवीगाळ केली, असे निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. 

या घटनेनंतर सर्व निवासी डॉक्टर अपघात विभागसमोर  एकत्र आले. पहाटे तीन वाजता अपघात विभागात रुग्णसेवा देणार नसल्याचा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला. या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. सुक्रे हे घाटीत पोहोचले. निवासी डॉक्टरांसोबत त्यांनी चर्चा केली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आदी मागणी निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांकडे केल्या. या सगळ्यावर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर पहाटे पाच वाजेच्या सुमारास निवासी डॉक्टर पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी