विहिरीत आढळले स्त्री अर्भक
By Admin | Updated: March 10, 2017 00:18 IST2017-03-10T00:16:35+5:302017-03-10T00:18:05+5:30
शिरूर : तालुक्यातील गोमळवाडा एका विहिरीत स्त्री जातीचे अर्भक आढळले.

विहिरीत आढळले स्त्री अर्भक
शिरूर : तालुक्यातील गोमळवाडा एका विहिरीत स्त्री जातीचे अर्भक आढळले. गुरुवारी सकाळी ९ वाजता हा प्रकार समोर आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोमळवाडा येथे रस्त्यालगत बबन सूरे यांचे शेत आहे. त्यांच्या विहिरीत एक स्त्री जातीचे अर्भक पाण्यावर तरंगत असल्याचे कृष्णा सूरे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही खबर गावात दिली. त्यानंतर गावातील नागरिकांनी विहिरीभोवती गर्दी केली. घटनास्थळी फौजदार एम. आर. काझी, पोकॉ व्ही. एन. गिते, एस. आर. मुंडे यांनी भेट देवून पंचनामा केला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अर्भक पाण्याबाहेर काढले. ते दोन दिवसांपूर्वी जन्मलेले असावे असा अंदाज व्यक्त होत असून पाण्यात असल्याने दुर्गंधी सुटली होती. जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी शिरुर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. (वार्ताहर)