महिला हवालदार, पोलीस पाटील लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:07+5:302021-02-05T04:20:07+5:30
पोलीस हवालदार कांचन हरिश्चंद्र शेळके (४५) आणि पोलीस पाटील गणेश परसराम तोगे (३३, रा. वक्ती, ता. ...

महिला हवालदार, पोलीस पाटील लाचेच्या जाळ्यात
पोलीस हवालदार कांचन हरिश्चंद्र शेळके (४५) आणि पोलीस पाटील गणेश परसराम तोगे (३३, रा. वक्ती, ता. वैजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार हे देशी दारू विक्रीचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय सुरळीतपणे ठेवण्याकरिता आणि त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे दरमहा तीन हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तडजोडीअंती पंच साक्षीदारासमक्ष तोगे याने तीन हजार रुपये लाच घेतली. यावेळी सापळा लावलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला आणि महिला हवालदार शेळकेला अटक केली. पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर, कर्मचारी रवींद्र अंबेकर, गोपाल बरंडवाल, राजेंद्र सिनकर, चांगदेव बागुल यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.