पारधी समाजातील युवकांचा सत्कार
By Admin | Updated: August 13, 2014 00:25 IST2014-08-13T00:12:46+5:302014-08-13T00:25:33+5:30
नर्सी नामदेव : पारधी समाजातील पप्पू काळे व संजय काळे यांची पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल नर्सी ठाण्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

पारधी समाजातील युवकांचा सत्कार
नर्सी नामदेव : पारधी समाजातील पप्पू काळे व संजय काळे यांची पोलीस भरतीमध्ये निवड झाल्याबद्दल नर्सी ठाण्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सपोनि अशोक जाधव होते. उपसरपंच शाहुराव देशमुख, शाहीनखाँ पठाण, बबन सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष भिकाजी कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नंदा काळे हिचाही सत्कार झाला. सपोनि जाधव यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन बापूराव इंगोले यांनी केले. या कार्यक्रमास पाटील, शेख हमीद, मोबीनखाँ पठाण, समी मौलाना, बरकतखाँ पठाण, शेख अखील, शेख अतिक, गारोळे, विजय इंगोले, पोटे, रवी ढेंबरे आदी हजर होते. (वार्ताहर)