शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांच्या ब्लॅकमेलिंगला घाबरून मुलाने चोरलं आईचं ३६ ग्रॅम सोनं; वडिलांमुळे कट उघडकीस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:06 IST

स्मगलिंगमध्ये अडकल्याची भीती अन् मित्रांचंच 'फेक पोलीस' नाटक! घराघरातील आई-वडिलांचे डोळे उघडणारी छत्रपती संभाजीनगरची धक्कादायक घटना.

छत्रपती संभाजीनगर : रोज सोबत राहणाऱ्या मित्रांनीच अल्पवयीन मित्राला सोन्याच्या स्मगलिंगमध्ये अडकल्याची धमकी देत घाबरवले. नंतर मामाचा पोलिस अधिकारी मित्र असल्याचे सांगून प्रकरण मिटवण्यासाठी घरातून आईचे ३६ ग्रॅम सोने चोरण्यासाठी भाग पाडले. घरात मुलाच्या वागण्यात बदल झाल्याचे वडिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी विश्वासात घेतल्यावर मुलाने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिलांनी थेट जवाहरनगर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी वेदांत राठोड, गौरव धनवडे यांना अटक केली तर अन्य तिघे पसार झाले. न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

१७ वर्षीय सुरेशला (नाव बदलले) ३ नोव्हेंबरला त्याचा मित्र वेदांत मिलिंद महाविद्यालय परिसरात घेऊन गेला होता. तेथे अचानक अंधारात दुचाकीवर आलेल्यांनी पोलिस असल्याचे सांगून सुरेश, वेदांतला सोन्याच्या स्मगलिंगसाठी आल्याचा आरोप ठेवला. चौकशी करून मोबाइल तपासून ४ नोव्हेंबरला अटकेची धमकी देत सोडून दिले. वेदांतने सुरेशला धीर देत त्याचा तेजस्वी नावाच्या मित्राच्या मामाचे पोलिस अधिकारी ओळखीचे असल्याचे सांगून प्रकरणातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले. ४ नोव्हेंबरच्या सकाळी ९ वाजता सुरेश, तेजस्वी, वेदांत, गौरव सर्वजण जबिंदा मैदानावर भेटले. तेथे गौरवने लाऊडस्पीकरवर काॅल लावण्याचे नाटक केले. कॉलवरील व्यक्तीने पोलिस असल्याचे भासवत तुमच्याविरुद्ध तक्रार आल्याचे सांगितले. प्रकरण मिटवण्यासाठी ११ लाख रुपये लागतील, अशी अट घातली. त्यानंतर गौरव वाळुजच्या त्या पोलिसाला भेटून येतो, असे नाटक करत निघून गेला.

मग सुरू झाले ब्लॅकमेलिंगचे नाटक- ४ नोव्हेेंबरच्या सायंकाळी गौरवने सुरेशची भेट घेतली. ११ लाखांपैकी तो २ लाख रुपये देऊन आला. उर्वरित ९ लाख सुरेश, विनोद व तेजस यांनी मिळून द्यायचे सांगितले. त्यासाठी सुरेशला ३ लाखांऐवजी घरातून सोने घेऊन येण्यासाठी दबाव टाकला.- घाबरलेल्या सुरेशने आईचे घरातील २१ ग्रॅमचे सोन्याचे गंठण गुपचूप गौरवला दिले. सुरेश घाबरल्याचे लक्षात आल्याने गौरवने आणखी पैशांची मागणी सुरू केली.- सुरेशने पैसे, सोने देण्यास नकार दिल्यावर गौरवने अटकेची भीती दाखवून पुन्हा दागिन्यांसाठी दबाव टाकला. त्या भीतीने सुरेशने ६ नोव्हेंबर रोजी त्याला आईची १६ ग्रॅमची सोन्याची पोत दिली.

जिवलग मित्रांकडे व्यक्त झाला अन् समोर आला खरा प्रकारगौरवच्या पैशांच्या वाढत्या मागणीमुळे सुरेश तणावाखाली गेला. त्याने त्याच्या जिवलग मित्रांना याबाबत सांगितले. मित्रांनी सुरेशला धीर देत बालाजीनगरमधील गौरवला मामा सांगणाऱ्या तेजस्वीला गाठले. सुरेशच्या मित्रांनी दमदाटी करताच तेजस्वीने सत्य कबूल केले. गौरव त्याचा मामा नाही. मिलिंद महाविद्यालय परिसरात आलेलेही पोलिस नव्हते. कॉलवरील व्यक्तीही पोलिस नसून केवळ सुरेशकडून पैसे, दागिने उकळण्यासाठी रचलेले नाटक असल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ गौरव, वैभवला सोने परत मागितले. मात्र, त्यांनी फाशी घेण्याची धमकी देत सुरेशलाच धमकावले.

वडिलांना प्रकार सांगितलात्याच दरम्यान सुरेशच्या आई-वडिलांना घरातून दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. तेव्हा सुरेशही वैभव, गौरवच्या आत्महत्येच्या धमक्यांमुळे घाबरलेला होता. वडिलांनी त्याला विश्वासात घेतल्यावर त्याने वडिलांना सर्व घटनाक्रम सांगितला व त्यांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Son Steals Mom's Gold Due to Blackmail; Father Uncovers Truth

Web Summary : A minor, blackmailed by friends posing as cops, stole 36 grams of gold from his mother. The father noticed changes, learned the truth, and reported it to the police, leading to arrests.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर