शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
सरकारी कोट्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये हडपले! IPS रश्मी करंदीकर यांच्या पतीला कोर्टाकडून दिलासा नाही
4
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
5
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
6
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
7
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
8
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
9
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
10
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
11
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
12
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
13
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
14
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
15
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
17
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
18
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
19
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
20
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच

परतीच्या पावसाच्या धास्तीने वॉटरप्रूफ लायटिंगकडे ओढा; चायना-इंडियन लायटिंगचा लखलखाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:18 IST

यंदा ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने वॉटरप्रूफ लायटिंग खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसत आहे.

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या दिवाळी खरेदीत ‘स्वदेशी’ उत्पादने खरेदी करा, अशी साद घालण्यात आली आहे. बाजारात मात्र भारतीय बनावटीच्या व मेड इन चायना लायटिंगचा लखलखाट पाहण्यास मिळत आहे. यंदा ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने वॉटरप्रूफ लायटिंग खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसत आहे.

पाण्यात भिजली तरी लायटिंग होणार नाही खराबपाऊस पडला तर लायटिंग खराब होते, शॉक लागतो, अशी तक्रार येत असते. मात्र, यंदा देशभरात पावसाने थैमान घातले आणि अजूनही ऐन दिवाळीत परतीचा पाऊस जोर लावणार असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे बाजारात वॉटरप्रूफ लायटिंग आल्या आहेत. कितीही पाऊस आला तरी बिनधास्त राहा. कारण, पाण्यात या लायटिंग खराब होत नाहीत. पावसात भिजली तरीही लायटिंगचा लखलखाट कायम राहील अशा लायटिंगची किंमत ६०० रुपयांपासून पुढे आहे.- किशोर संकलेचा, व्यापारी

१४ रुपयांपासून लायटिंगमेड इन चायनाने लायटिंगच्या बाजारात पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. १०० पेक्षा अधिक व्हरायटी बाजारात आल्या आहेत. यात अवघ्या १४ रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत लायटिंग उपलब्ध आहेत.- रौनक बोरा, व्यापारी

रिमोटची लायटिंग लई भारीरिमोटने ऑपरेट करता येईल अशा लायटिंग बाजारात आल्या आहेत. भारतीय असो वा चिनी लायटिंग ग्राहकांना जरा हटके, आकर्षक, आधुनिक लायटिंग पाहिजे असते. त्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करण्याची तयारी ग्राहक दाखवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पणतीच्या विद्युत तोरणाला विशेष मागणीबाजारात पणतीच्या आकाराची पारदर्शक विद्युत तोरणे आली आहेत. लहान-मोठ्या आकारातील विद्युत पणत्यांचे तोरण, तसेच ओम, स्वस्तिक अशा आकारातील माळा, झीरो बल्बच्या माळांनाही आवर्जून मागणी दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Waterproof Lighting Demand Surges Amidst Rain Fears; China-Indian Lights Shine

Web Summary : Diwali shoppers favor waterproof lighting due to rain forecasts. Both Chinese and Indian lights are popular, with prices ranging from affordable to premium. Remote-controlled and traditional diya-shaped electric lights see high demand.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDiwaliदिवाळी २०२५