शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धाक संपला ! कुख्यात गुन्हेगाराचा पोलिसांवर चाकू हल्ला, १५ दिवसांत हल्ल्याची चौथी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:15 IST

छत्रपती संभाजीनगरात १५ दिवसांतील पोलिसांवर हल्ल्याची चौथी घटना, हाताला कडकडून चावा घेतल्याने गुन्हे शाखेचे अंमलदार जखमी

छत्रपती संभाजीनगर : ‘आज तुमको खत्म कर देता’, असे म्हणत कुख्यात गुन्हेगार शेख वाहेद शेख मोहसीन (२१, रा. सईदा कॉलनी) याने गुन्हे शाखेच्या पथकावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी हा वार चुकवला. मात्र, यात त्याने कडकडून चावा घेतल्याने एक अंमलदार जखमी झाला. रविवारी सायंकाळी जटवाड्यात ही घटना घडली.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना वाहेदने रविवारी कांचनवाडीतील दुकान फोडल्याची माहिती मिळाली होती. अंमलदार विजय निकम, मनोहर गिते, कृष्णा गायके, ज्ञानेश्वर पवार यांच्यासह प्रवीण वाघ सायंकाळी जटवाडा रोडवर गेले. एका चहाच्या हॉटेलवर वाहेद दिसताच त्यांनी तेथे धाव घेतली. पथक त्याच्याजवळ जाताच त्याने शर्टखालून चाकू काढून पथकाच्या दिशेने भिरकावला. अंमलदार निकम यांनी त्याला कंबरेला पाठीमागून पकडले. त्यात वाहेदने दंडाला कडकडून चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो सतत चाकू भिरकावत राहिला. यात पोलिस व त्याच्यात चांगलीच झटापट झाली. त्याला नियंत्रणात आणून अटक करण्यात आली, तर जखमी निकम यांना रुग्णालयात दाखल केले.

तुमको खत्म कर देतावाहेदकडे ३० सेमी लांब व ३ सेमी रुंदीच्या पात्याचा धारदार चाकू होता. त्याने पोलिसांना शिवीगाळ करून मोठमोठ्याने चाकू उगारून ‘आज तुमको खत्म कर देता’, अशी धमकी दिली. त्याच्याकडील मोबाइल कांचनवाडीतील चोरीच्या गुन्ह्यातील निष्पन्न झाला. त्याच्यावर बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून यथेच्छ पाहुणचारही करण्यात आला. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे तपास करत आहेत. त्याच्यावर आतापर्यंत लूटमार, दरोडा, हत्येचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ल्याचे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ क्रूर गुन्हेगार असून, सध्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात आहे.

धाक संपला, पोलिसांवर हल्ल्याची चौथी घटना-२ जानेवारी रोजी वाळुजच्या एनआरबी चौकात वाहतूक पोलिसांना मारहाण करण्यात आली.-६ जानेवारी रोजी रोपळेकर चौकात अल्पवयीन मुले वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेले.-१७ जानेवारी रोजी भर दुपारी गुन्हेगाराने पोलिस अंमलदारावर चाकू भिरकावून धमकावले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर