शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
3
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
4
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
5
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
6
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
7
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
8
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
9
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
10
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
11
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
12
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
13
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
14
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
15
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
16
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
17
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
18
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
19
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
20
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

धमकी देणाऱ्याला संपवून भीती कायमची संपवली; जुन्या वादातून जम्याचा खून करणारे पितापुत्र अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 18:00 IST

crime in Aurangabad : शुक्रवारी रात्री शहागंज रस्त्यावरील चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेसमोरील नवीन इमारीतीच्या गॅलरीत जम्या उर्फ जमीर खान याचा चाकूने भोसकून खून झाला होता.

ठळक मुद्देचार वर्षापूर्वी हाफ मर्डरचा गुन्हा नोंदविल्याने जम्याला झाली होती शिक्षा कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आल्यापासून तो पितापुत्रांना सारख्या धमक्या देत होता.

औरंगाबाद: चार वर्षापूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून पिता पुत्राने कुख्यात गुन्हेगार जम्या उर्फ जमीर खान शब्बीर खान (रा. नवाबपुरा) याचा चाकूने भोसकून खून केल्याचे पोलीस तपासांत निष्पन्न झाले. सिटीचौक पोलिसांनी आरोपी पितापुत्राला आज पहाटे अटक केली. शेख नब्बू शेख हबीब (५२) आणि शेख शोएब शेख नब्बू अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री शहागंज रस्त्यावरील चंद्रसागर दिगंबर जैन धर्मशाळेसमोरील नवीन इमारीतीच्या गॅलरीत जम्या उर्फ जमीर खान याचा चाकूने भोसकून खून झाला होता. याप्रकरणी रात्री उशीरा सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवून खबऱ्यांना कामाला लावले. तेव्हा हा खून आरोपी नब्बू आणि त्याचा पुत्र शोएब यांनी केल्याचे समजले. आरोपी नब्बू आणि जम्या हे नात्याने साडू होते. चार वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर जम्याने अवघ्या काही महिन्यात बायको सोडून दिली होती. यावरुन नब्बू, शोएब आणि मयत जम्या यांच्यात जोरदार हाणामारी झाली होती. 

याप्रकरणी आरोपी पितापुत्राने जम्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला होता. या गुंह्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून जम्या जेलमध्ये होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेल प्रशासनाने जम्याला पॅरोल मंजूर केली. यामुळे सहा महिन्यापासून तो जेलबाहेर आला आहे. तेव्हापासून तो पितापुत्रांना सारख्या धमक्या देत होता. नब्बू हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. जम्या हा गुन्हेगारीप्रवृत्तीचा असल्याने त्याची या पितापुत्राला भिती वाटत असे. यामुळे शोएब हा सतत सोबत चाकू बाळगायचा. शुक्रवारी रात्री शहागंज येथे जम्याने त्यांच्यासोबत भांडण सुरू केले. यावेळी त्यांच्यात हाणामारी झाली तेव्हा पितापुत्राने त्याला चाकूने भोसकून ठार मारल्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले. सहाय्यक निरीक्षक एस के खटाने तपास करीत आहेत. आरोपींना चार दिवस पोलीस कोठडीआरोपी नब्बू आणि शोएब या पिता पुत्राला आज अटक केल्यावर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. आरोपीची सात दिवस पोलीस कोठडी मागितली. तेव्हा न्यायालयाने दोन्ही आरोपीना चार दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. चार वर्षापूर्वी झालेल्या मारामारीनंतर जम्यावर पितापुत्राने दाखल केलेल्या हाफ मर्डर (कलम ३०७)च्या गुंह्यात जम्याला न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. यातच तो पॅरोलवर बाहेर आल्यापासून पितापुत्राना धमकावून भांडण करीत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद