फौजदार पुल्ली यांच्या गाडीला अपघात
By Admin | Updated: April 16, 2016 00:14 IST2016-04-16T00:03:05+5:302016-04-16T00:14:24+5:30
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथून नळदुर्गच्या दिशेने निघालेले दरोडा प्रतिबंधक पथकाचे फौजदार भास्कर पुल्ली यांच्या गाडीला शुक्रवारी सायंकाळी तीर्थानजीक अपघात झाला़

फौजदार पुल्ली यांच्या गाडीला अपघात
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथून नळदुर्गच्या दिशेने निघालेले दरोडा प्रतिबंधक पथकाचे फौजदार भास्कर पुल्ली यांच्या गाडीला शुक्रवारी सायंकाळी तीर्थानजीक अपघात झाला़ वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे़
पोलीस मुख्यालयातील दरोडा प्रतिबंधक विभागाचे फौजदार भास्कर पुल्ली हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उस्मानाबाद येथून नळदुर्गकडे निघाले होते़ तुळजापूर येथून पुढे नळदुर्ग मार्गावर गेल्यानंतर तीर्थानजीकच्या वळणावर अचानक त्यांची गाडी पलटी झाली़ या अपघातात फौजदार भास्कर पुल्ली हे जखमी झाले़ अपघातानंतर तुळजापूर, नळदुर्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पुल्ली यांना उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले़