पत्नीपीडितांचा कँडलमार्च काढून फादर्स डे
By Admin | Updated: June 19, 2017 00:39 IST2017-06-19T00:20:20+5:302017-06-19T00:39:24+5:30
वाळूज महानगर : पत्नीपीडित पुरुष आघाडी संघटनेतर्फे रविवारी (दि.१८) बजाजनगरात कँडल मार्च काढून अनोख्या पद्धतीने फादर्स डे साजरा करण्यात आला.

पत्नीपीडितांचा कँडलमार्च काढून फादर्स डे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : पत्नीपीडित पुरुष आघाडी संघटनेतर्फे रविवारी (दि.१८) बजाजनगरात कँडल मार्च काढून अनोख्या पद्धतीने फादर्स डे साजरा करण्यात आला.
पत्नीच्या छळामुळे पुरुषांच्या आत्महत्या समाजात वाढत आहेत. एकतर्फी न्यायप्रक्रियेत पुरुष भरडला जात आहे. समाजव्यवस्थेच्या या विदारक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी पत्नीपीडित पुरुष आघाडी संघटनेच्या वतीने रविवारी भरदिवसा कँडलमार्च काढून फादर्स डे साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोरे चौकातून सुरुवात झालेल्या कँडल मार्चचा मोहटादेवी मंदिरमार्गे महाराणा प्रताप चौकात समारोप करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे, विशाल नांदूरकर, किशोर माटे, बापू तरवटे, प्रवीण गाले, तुषार मादळमोहीकर, डॉ. विजय पाटील, उत्तम राठोड, सिद्धार्थ रामटेके, संजय भांड, बसलिंग नाईक, रामेश्वर नवले, चंद्रकांत पगार, रवींद्र पाटील आदींची उपस्थिती होती.