घरगुती कारणावरून पित्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2017 00:30 IST2017-06-04T00:27:26+5:302017-06-04T00:30:31+5:30

कडा : घरात रोजच भांडणे होत होती.यातून कायमची सुटका व्हावी, म्हणून बापाचा तरवारीने सपासप वार करून खून केला

Father's blood for domestic reasons | घरगुती कारणावरून पित्याचा खून

घरगुती कारणावरून पित्याचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : घरात रोजच भांडणे होत होती.यातून कायमची सुटका व्हावी, म्हणून बापाचा तरवारीने सपासप वार करून खून केला. ही घटना आष्टी तालुक्यातील कडा येथील किर्डले वस्तीवर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
संपत कर्डिले असे निर्दयी मुलाचे नाव असून काकासाहेब किसन कर्डिले असे त्या त्या दुर्दैवी बापाचे नाव आहे. कर्डिले यांच्या घरी रोजच वेगवेगळ्या कारणावरून भांडण होत असायचे. घरात आई, वडील, आजी रहातात. तर बायको साबलखेड गावी माहेरी असते. घरातील वाद रोजच वाढत होते. हाच राग मनात धरून एकुलता एक असणाऱ्या संपतने वडिलांवर तलवारीने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेले काकासाहेब कर्डिले रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि जागीच ठार झाले. काकासाहेब कर्डिले यांचे बंधू दत्तात्रय कर्डिले यांच्या फिर्यादीवरून संपत कर्डिले विरूद्ध आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय हमीद शेख करीत आहे.

Web Title: Father's blood for domestic reasons