शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

साथीदारांच्या मदतीने चारवर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न वडिलांनी हाणून पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:30 IST

अनैतिक देहव्यापार करण्याच्या उद्देशाने नातेवाईकच चारवर्षीय मुलीचे अपहरण करीत असल्याचा संशय खुद्द चिमुकलीच्या वडिलांनाच आला. त्यांनी अपहरणक र्त्यांचा पाठलाग केला. मात्र, अपहरणकर्ते चिमुकलीला कारमध्ये बसवून सुसाट निघाल्याचे पाहून वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला अपहरणकर्त्यांची माहिती कळविली अन् पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला.

ठळक मुद्देबायपासवर चिमुकलीची केली सुटका : थरार पाठलाग अन्... पोलिसांनी सिनेस्टाईल अडविली अपहरणकर्त्य्यांची कार

औरंगाबाद : अनैतिक देहव्यापार करण्याच्या उद्देशाने नातेवाईकच चारवर्षीय मुलीचे अपहरण करीत असल्याचा संशय खुद्द चिमुकलीच्या वडिलांनाच आला. त्यांनी अपहरणक र्त्यांचा पाठलाग केला. मात्र, अपहरणकर्ते चिमुकलीला कारमध्ये बसवून सुसाट निघाल्याचे पाहून वडिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला अपहरणकर्त्यांची माहिती कळविली अन् पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. सातारा परिसरात बीड बायपासवर पोलिसांनी सिनेस्टाईल कार अडवून अपहरणकर्त्यांच्या तावडीतून चिमुकलीची मुक्तता केली. हा खळबळजनक प्रकार जिन्सी परिसरातील संजयनगर येथे २४ रोजी दुपारी घडली.अन्वर पठाण, शुभम लक्ष्मण महेकले, हसनखान नूरखान आणि संगमेश्वर रघुनाथ गाडे (सर्व रा. लातूर), अशी अटक अपहरणकर्त्यांची नावे आहेत. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, संजयनगर-बायजीपुरा येथील सय्यद झियाउद्दीन सय्यद नासेरउद्दीन हे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी अन्वर हा त्यांचा मावसमामा आहे. काही दिवसांपासून शुभम हा सय्यद यांना फोनवरून शिवीगाळ करीत होता. शिवाय त्याने त्यांना मुलीचे अपहरण करण्याची धमकीही दिली होती. २४ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अन्वर हा सय्यद यांच्या घरी आला. त्यावेळी त्याने सय्यद यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर खुलताबाद येथे उरुसाला जात असून, मुसकुरा (वय ४) हीस सोबत नेतो, असे म्हणाला. मुसकुराला सोबत घेऊन तो जाऊ लागला. त्यावेळी सय्यद त्याच्या मागे आले. तेव्हा त्यांना धमकावणारा शुभम उभा दिसला. अन्वर, शुभम आणि त्याचे अन्य साथीदार हसन आणि संगमेश्वर हे मुसकुराला कारमधून नेताना दुरूनच त्यांच्या नजरेस पडले. सय्यद यांना संशय आल्याने त्यांनी घरापासून रेल्वेस्टेशनपर्यंत अन्य वाहनाने अन्वर आणि त्याच्या साथीदारांच्या कारचा पाठलाग केला. खुलताबादऐवजी ते दुसरीकडेच जात असल्याने सय्यद यांचा संशय बळावला आणि त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला त्या कारची माहिती दिली. अलर्ट झालेल्या शहर पोलिसांनी कारचा शोध सुरू केला तेव्हा ती कार रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरून महानुभाव आश्रम चौकमार्गे बीड बायपासने जात असल्याचे समजले. सातारा पोलिसांनी लगेच बायपासवर अन्वर आणि अन्य आरोपींच्या कारसमोर पोलिसांची गाडी आडवी लावून कार थांबविली आणि अन्वर, शुभम, हसन आणि संगमेश्वर यांच्या ताब्यातून चिमुकल्या मुसकुराची मुक्तता केली. त्यानंतर सर्व अपहरणकर्त्यांना जिन्सी ठाण्यात आणून अटक केली.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद