शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
"केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
3
मराठा आरक्षण आंदोलन पेटणार, मनोज जरांगे पाटील ४ जून पासून पुन्हा उपोषण करणार 
4
Weather Alert: मुंबईत आजही पाऊस लावणार हजेरी; राज्यातील ९ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; असा आहे हवामान अंदाज!
5
शुभकार्यासाठी निघाले होते, पण...; बस-कारच्या धडकेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चिमुकला बचावला
6
Women World Cup 2024: भारत वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळणारच; हरमनने सांगितले तगडे आव्हान
7
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
8
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
10
'गलिच्छ! साडी नेसून लोकांच्या मांडीवर बसतो', कपिल शर्मा शोवर भडकला सुनील पाल
11
Video: बापरे..! चिखलात लपलेल्या मगरीने अचानक उघडला जबडा अन् पुढे जे घडलं...
12
'या' IPO चं जबरदस्त लिस्टिंग, पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
14
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्ट्रात कधी बरसणार?
15
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
16
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
17
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
18
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
19
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
20
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत

वडिलांनी सोडले, आईने दुसरे लग्न केले; आजीने नातीला ५ हजारांत विकले!

By सुमित डोळे | Published: March 28, 2024 6:11 PM

पैशांसाठी आजीने नातीला महिला हाेमगार्डला ५ हजारांत विकले; सिटी चौक पाेलिसांकडून बारा तासांत शोध

छत्रपती संभाजीनगर : पैशांसाठी सख्ख्या चुलत आजीनेच चार वर्षांच्या नातीचे अपहरण करून तिला ५ हजार रुपयांत विकले. सोमवारी पहाटे ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशीनाथ हुल्लाळे (५०) हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेगम अजीज खान (४८, रा. मिसारवाडी) हिच्याकडून तिला विकत घेतले. सिटी चौक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत सलीमा व अलकाचा शोध घेत दोघींना अटक केली. न्यायालयाने दोघींना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चार वर्षांची रिहाना (नाव बदलले आहे) आजी, मामासोबत रोजाबाग परिसरात राहते. २४ मार्च रोजी दुपारी रिहाना परिसरात अन्य मुलांसोबत खेळत होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. ती न सापडल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने सिटी चौक पाेलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले.

सीसीटीव्ही फुटेजची मदतउपनिरीक्षक प्रशांत मुंडे, शिवाजी केरे यांनी पथकासह मुलीचा शोध सुरू केला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये एक बुरखाधारी महिला रिहानाला घेऊन जात असल्याचे कैद झाले. सायंकाळी पोलिसांच्या हे फुटेज हाती लागताच त्यांनी कुटुंबाला दाखवले. तेव्हा रिहानाच्या आजीने ती त्यांचीच नातेवाईक सलीमा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सलीमाचा शोध सुरू केला तेव्हा ती शहागंजमध्ये काम करत असलेल्या हॉटेलमध्ये आढळली. पोलिसी खाक्या दाखवताच तिने रिहानाला वैजापूर बसस्थानकावर जाऊन कोपरगावच्या महिलेस ५ हजार रुपयांत विकल्याची कबुली दिली. अंमलदार राजेंद्र साळुंके, सुरेश बोडखे, आनंद वाहुळ, मनोहर त्रिभुवन, अन्वेज शेख, प्रवीण टेकले यांनी कोपरगाव गाठले. रिहानाची सुटका करून त्यांनी अलकाला अटक केली.

पैश्यांसाठी विकले नातीलारिहानाचे वडील दुबईत गेल्यानंतर त्यांनी पत्नीला सोडून दिले. त्यामुळे रिहानाच्या आईने देखील दुसरा विवाह केला. त्यामुळे रिहाना जन्मापासून आजीकडेच राहते. सलीमाने त्याचाच गैरफायदा घेत तिला विकण्याचा कट रचला. विशेष म्हणजे, अलकाने ती नगर पोलिस दलात होमगार्ड असल्याचे सांगितले. गावातील नातेवाईकांमार्फत तिने सलीमाकडून रिहानाला विकत घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद