१९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद
By Admin | Updated: October 17, 2014 00:26 IST2014-10-17T00:14:20+5:302014-10-17T00:26:43+5:30
भोकरदन: विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ६७ हजार २७७ मतदारांपैकी १ लाख ९७ हजार ८८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१९ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद
भोकरदन: विधानसभा मतदार संघात एकूण २ लाख ६७ हजार २७७ मतदारांपैकी १ लाख ९७ हजार ८८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात ७४़०४ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
भोकरदन विधानसभा मतदार संघात २ लाख ६७ हजार २७७ मतदान आहेत. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ४०६ पुरूष तर १ लाख २४ हजार ८७१ मतदान आहेत. त्यापैकी १ लाख ९७ हजार ८८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १ लाख ७ हजार २२९ पुरुष तर ९० हजार ६५४ स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ३०० मतदान केंद्रांपैकी भोकरदन तालुक्यातील तळणी येथील मतदान केंद्र क्रमांक १०१ वर सर्वाधिक ९०़३० टक्के मतदान झाले. या मतदान केंद्रावरील ४९५ मतदारांपैकी ४४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर तालुक्यातीलच मेहेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक ७८ वर ९०़०६ टक्के मतदान झाले. या ठिकाणी ८१५ मतदारांपैकी ७३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सर्वाधिक कमी मतदान भोकरदन शहरातील मतदान केंद्र १७७ वर झाले. या ठिकाणी ५१़९५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
या केंद्रावरील ८२० मतदारांपैकी ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे़ भोकरदन मतदार संघात किरकोळ प्रकार वगळता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)