शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

१०१ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

By admin | Updated: January 19, 2015 00:58 IST

केज : येथील केज नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. १७ संवेदनशील केंद्रावर सरासरी ७७ टक्के मतदान झाले.

केज : येथील केज नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. १७ संवेदनशील केंद्रावर सरासरी ७७ टक्के मतदान झाले. पोलीस बंदोबस्त चोख असल्याने कोणत्याही मतदान केंद्रावर गोंधळ झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली.केज नगर पंचायतीच्या १७ प्रभागातील १७ नगरसेवकांच्या जागेसाठी रविवारी सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. शहरामधील सर्वच मतदान केंद्रे संवेदनशिल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी थंडीचा कडाका असतानाही ८ वाजल्यापासून मतदारांनी रांगा लावण्यास सुरूवात केली होती. ९.३० च्या सुमारास १३.७९ टक्के, ११ वाजता ३०.९० टक्के, दीड वाजता ४८.४४ टक्के, ३.३० वाजता ६३.४८ टक्के तर साडेपाच वाजता सरासरी ७७ टक्के मतदान झाले.निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार पी. के. ठाकूर यांनी प्रत्येक मतदान केंद्राला वारंवार भेटी दिल्या. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. केज नगर पंचायत निवडणुकीत एकूण १८ हजार ७५० मतदार होते. त्यापैकी पुरूष व महिला अशा एकूण १४ हजार ४२१ नागरिकांनी मतदानांचा हक्क बजावला.३०० पोलिसांची कुमकनिवडणुकीत गोंधळ होऊ नये यासाठी एक पोलीस अधीक्षक, दोन निरीक्षक, पाच सहायक निरीक्षक, १४४ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या नियुक्त करण्यात आल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक केंद्रावर पोलिसांची करडी नजर होती. शहरात संपूर्ण मतदान प्रक्रिया कालावधीत पोलिसांनी पेट्रोलिंग केली होती. यामुळे कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही, असे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. (वार्ताहर)सोमवारी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात सहा टेबलवर मतमोजणी होणार आहे. एका फेरीत सहा प्रभागांची मतमोजणी होईल. मतमोजणीच्या तीन फेऱ्या होणार असून १२ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी दिली.प्रभाग क्रमांक सहामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना दुपारी भाजपचे उमेदवार व एका अपक्ष उमेदवारामध्ये बाचाबाची झाली. एकाने दुसऱ्याच्या श्रीमुखात भडकावल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली.काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाने प्रत्येकी १७ प्रभागांमध्ये १७ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना १०, शेकाप ५, मनसे १ तर ३४ अपक्ष असे एकूण १०१ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख उमेदवारांमध्ये विद्यमान उपनगराध्यक्ष आदित्य पाटील, संदीप इंगळे, पशुपती दांगट, हारूण इनामदार, विद्या पाटील, पुष्पलता भोसले, किसन कदम, अर्चना ढाकणे, दिलीप डोंगरे, डॉ. अरूणा नेहरकर यांचा समावेश आहे.