शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमध्ये जेवण्यावरून दोन पोलिसांवर जीवघेणा हल्ला, पडेगावातील घटना

By राम शिनगारे | Updated: May 23, 2023 20:41 IST

छावणी ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल.

छत्रपती संभाजीनगर : पडेगावातील माऊली रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास जेवण्यासाठी गेलेल्या उस्मानपुरा ठाण्यातील दोन पोलिसांना हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेलमधील स्वयपाकीनेही पोलिसांनी चाकू हल्ला केल्याचा दावा केला. या प्रकरणी परस्परविरोधी जिवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) नोंदविण्यात आला.

छावणी ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील कर्मचारी सतीष जाधव (रा. द्वारकानगर, पडेगाव) व शशिकांत कंचार हे ठाण्यातुन ११.३० वाजेच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. १२ वाजेच्या सुमारास त्यांना पडेगावातील माऊली रेस्टॉरंट उघडे दिसले. तेव्हा त्यांनी गाडी थांबवून जेवणासाठी जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकाने जेवण मिळणार नाही, असे सांगितले. त्यावरून बाचाबाची सुरू झाली.

तेव्हा हॉटेल मालक संतोष आमलेच्या मुलाने आम्ही तुम्हालाच विकत घेऊ, आमच्या हॉटेलमध्ये तुमची जेवण्याची लायकी नाही, अशी भाषा वापरली. तेव्हा सतीष जाधव यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार छावणी पोलिसांची ११२ गाडी घटनास्थळी आली. तोपर्यंत हॉटेल मालकही घटनास्थळी दाखल झाला. संतोष आम्ले याच्यासह मुलगा आणि ७ ते ८ कर्मचाऱ्यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली.

यात दोघांचे डोळे, तोंड, पायवर लोखंडी रॉड, लाकडाच्या दांड्याने मारहाण केली. हा प्रकार ११२ च्या पोलिसांसमोर घडला. त्यानंतर पीटर मोबाईल गाडी आल्यानंतर गंभीर जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना त्यानंतर घाटी उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी सतीष जाधव यांच्या तक्रारीवरून संतोष आमले, त्याच्या मुलासह ७ ते ८ कर्मचाऱ्यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. अधिक तपास सपोनि पांडुरंग भागिले करीत आहेत.स्वायपाकीची पोलिसांच्या विरोधात तक्रार

माऊली रेस्टॉरंटमधील स्वयपाकी गोपीनाथ जाधव (रा. पडेगाव) यांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिस कर्मचारी दारू पिऊन रात्री १२ वाजता हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. त्यांना हॉटेल बंद झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी शिविगाळ करीत चाकूने हल्ला केला. या वादात हॉटेल मालकाच्या मुलाचा महागडा मोबाईलही फोडल्याचे तक्रारी म्हटले आहे. अधिक तपास सपोनि. ज्ञानेश्वर अवघड करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी