अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलसमोर उपोषण

By Admin | Updated: July 1, 2014 01:01 IST2014-07-01T00:05:23+5:302014-07-01T01:01:42+5:30

वडवणी: वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील गट क्र. ३०२, ३१२ या जागेवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण केले आहे.

Fasting before tehsil to remove encroachment | अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलसमोर उपोषण

अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलसमोर उपोषण

वडवणी: वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील गट क्र. ३०२, ३१२ या जागेवर गावातीलच काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
गावातीलच काही लोकांनी ३०२, ३१२ हा गट क्रमांक असणाऱ्या जागेवर अतिक्रमण केले आहे. ही जागा अनुसूचित जातीसाठी शासनाने मंजूर केलेली आहे. या जागेवरच अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली. मात्र याची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. आपल्याला न्याय मिळत नसल्याचे पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कैलास खळगे यांच्या नेतृत्वाखाली १५ ते २० ग्रामस्थ सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत अतिक्रमण हटविले जाणार नाही, तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. या उपोषणकर्त्यांकडे सायंकाळपर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी फिरकला नाही. या उपोषणात गौतम भिवा खळगे, मधुकर रोहिदास खळगे, राम बन्सी खळगे यांच्यासह १५ ते २० ग्रामस्थ तहसीलसमोर उपोषणास बसले आहेत. याबाबत वडवणीचे तहसीलदार एन.जी. झंपलवार म्हणाले, मी कामानिमित्त बाहेर आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्यात येतील. (वार्ताहर)

Web Title: Fasting before tehsil to remove encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.