्रपावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर
By Admin | Updated: June 26, 2017 23:39 IST2017-06-26T23:37:52+5:302017-06-26T23:39:48+5:30
जवळा बाजार : जवळा बाजारसह परिसरात गत दहा - बारा दिवसांपासून एकही दमदार पाऊस न झाल्याने या परिसरातील पिके आता कोमजण्यास सुरूवात झाली आहे.

्रपावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : जवळा बाजारसह परिसरात गत दहा - बारा दिवसांपासून एकही दमदार पाऊस न झाल्याने या परिसरातील पिके आता कोमजण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
यावर्षी मृग नक्षत्रपूर्व तसेच मृग नक्षत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने या भागात खरीप हंगामातील पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस इ. पिकांचा समावेश आहे. परंतु, गत दहा - बारा दिवसांपासून परिसरात एकही दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील पिके पाण्याअभावी कोमेजण्यास सुरूवात झाली आहे. तर येथील काही भागात अल्पसा पाऊस झाल्यामुळे पेरणी केलेले सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. जवळा बाजारसह परिसरात दररोज ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. परंतु, पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता वरूणराजाकडे लागले आहे. येत्या तीन - चार दिवसांत परिसरात दमदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.