शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा शेतकरी संपावर जातील; सुकाणू समितीचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 19:18 IST

सरकारने शेतकर्‍यांच्या एकाही मागणीची पुर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली.

ठळक मुद्देस्वामी रामानंद तिर्थ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकरी संघटनांसह शेतीसंबंधी कार्य करणार्‍या सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक आज पार पाडली. सुकाणू समितीतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात २३ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान ‘किसान जनजागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे.संपासारखेच तीव्र आंदोलनाचे हत्यार जून महिन्यादरम्यान काढण्यात येणार असल्याचेही सूकाणु समितीच्या सदस्यांनी सांगितले.

औरंगाबाद : राज्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजाणीसह इतर मागण्यासाठी शेतकर्‍यांनी संप पुकारला होता. तेव्हा राज्य सरकारने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीशी केलेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य करत त्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला होता. मात्र सरकारने शेतकर्‍यांच्या एकाही मागणीची पुर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली.

स्वामी रामानंद तिर्थ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकरी संघटनांसह शेतीसंबंधी कार्य करणार्‍या सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक शनिवारी (दि.२४) पार पाडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व सुकाणू समितीचे राघुनाथदादा पाटील, किशोर ढमाले, सुभाष लोमटे, एच. एम. देसरडा, सुखदेव बन, काझंमभाई, रमेश खंडागळे, मनोहर टाकसाळ, भगवान भोजने, मिलिंद पाटील, रंगनाथ येवले, कचरू वाखडे, ज्ञानेश्वर भारती आदी उपस्थित होते.  सुकाणू समितीच्या सदस्यांनी सांगितले की, राज्य सरकारने सुकाणू समितीशी चर्चा करताना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पाळण्यात आले नाही.

यामुळे सुकाणू समितीतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात २३ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान ‘किसान जनजागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा, शेतकरी आंदोलन, विद्यापीठ नामांतरचा लढ्यातील शहीद आणि आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना अभिवादन केले जाणार आहे.  सरकारला केवळ इशारा देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेनंतरही सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी आंदोलन पहिल्यापेक्षा तिव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वेळी शेतकरी संपावर गेले होते. या संपासारखेच तीव्र आंदोलनाचे हत्यार जून महिन्यादरम्यान काढण्यात येणार असल्याचेही सूकाणु समितीच्या सदस्यांनी सांगितले.

ना कर्ज, ना करसुकाणू समितीच्या बैठकीत राज्य सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करत नाही. तोपर्यंत शेतकरी सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. शेतकरी कोणतेही कर, लाईटबील आणि बँकांची कर्ज  भरणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे अधिकारी कर्जवसूलीसाठी आले तरी त्यांना वसूली करू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या