घाटनांद्रा परिसरात उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:06 IST2021-05-13T04:06:01+5:302021-05-13T04:06:01+5:30
शेततळी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या आधुनिक शेतीपद्धतीमुळे यावर्षी चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी ...

घाटनांद्रा परिसरात उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
शेततळी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून या आधुनिक शेतीपद्धतीमुळे यावर्षी चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहे. घाटनांद्रासह परिसरात धारला चारणेर, पेंडगाव, वाडी, आदी परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मिरची लागवड केली जाते. साधारण दरवर्षी १० मे नंतरच मिरची लागवडीला सुरुवात होत असते; मात्र गेल्यावर्षीपासून पावसाचे प्रमाण चांगले असून, विहिरीतही पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांनी २० एप्रिलपासूनच मिरचीची लागवड सुरू केली आहे.
मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांना एकरी ५५ ते ६० हजार रुपये खर्च येतो. एप्रिल-मे महिन्यांत लागवड केलेली मिरची जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. या काळात बाजारपेठेत मिरचीला मोठी मागणी असते व भावही चांगला मिळतो.
फोटो : घाटनांद्रा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेले मिरचीचे पीक.
120521\img_20210512_151704_1.jpg
घाटनांद्रा परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेले मिरचीचे पिक.