कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या
By Admin | Updated: March 9, 2017 21:55 IST2017-03-09T21:55:58+5:302017-03-09T21:55:58+5:30
सिल्लोड तालुक्यातील माडगाव येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर या नैराश्यातून

कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, 9 - सिल्लोड तालुक्यातील माडगाव येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकी व डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर या नैराश्यातून लिम्बाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकऱ्यांचे नाव गणेश सांडु शिंदे (45 रा. मांडगाव) असे आहे.
अधिक माहिती अशी की, शिंदे हे बुधवारी रात्री घरी जेवण केले व पत्नीला बाहेरून येतो असे सांगून निघून गेले सकाळपर्यंत शिंदे हे घरी न आल्याचे बघून त्यांच्या पत्नी व नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला असता शिंदे यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच नातेवाइकांनी त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.शिंदे यांच्याकडे एक एक्कर शेती असून, त्यांनी सोसायटी येथून दहा हजार व नातेवाइकांकडून तीस हजार रुपये कर्ज घेतल्याची माहिती शिंदे यांच्या नातेवाइकांनी दिली. शिंदे यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली, नातवंड असा परिवार आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सपोनि शंकर शिंदे हे करीत आहे.