यावल पिंपरीत शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: October 29, 2015 00:15 IST2015-10-29T00:08:11+5:302015-10-29T00:15:57+5:30
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री येथील शेतकरी आसाराम शाहूराव उगले (५०) यांनी कर्जाला कंटाळून व सततच्या नापिकीमुळे मंगळवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

यावल पिंपरीत शेतकऱ्याची आत्महत्या
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री येथील शेतकरी आसाराम शाहूराव उगले (५०) यांनी कर्जाला कंटाळून व सततच्या नापिकीमुळे मंगळवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
या शेतकऱ्याच्या नावावर गट क्र. १३१ मध्ये १ हेक्टर ४० आर जमिन होती. त्यांच्याकडे महाराष्ट्र बँकेचे २ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज होते. मागील तीन वर्षापासून सततची नापिकी व घर खर्चाचा वाढता डोंगर याच्या काळजीत ते वावरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व विवाहित मुलगी आहे.
यावर्षी त्यांनी सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेतले होते. मात्र पीक उगवले नसल्याने त्यांना आर्थिक अडचणी येत होत्या.
तलाठी जी.डी. मगरे यांनी पंचनामा केला.
घनसावंगी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जमादार भीमराव मुंढे, जारवाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)