नापिकीला कंटाळून हिगोलीमध्ये शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: February 5, 2015 16:50 IST2015-02-05T16:50:28+5:302015-02-05T16:50:28+5:30
बँकांचे कर्ज आणि नापिक शेती यांना कंटाळून रघुनाथ यशवंते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. नापिकी आणि कर्जाची चिंता भुजंगे यांनी आपल्या पुतण्याला बोलून दाखवली होती.

नापिकीला कंटाळून हिगोलीमध्ये शेतक-याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.५ - बँकांचे कर्ज आणि नापिक शेती यांना कंटाळून रघुनाथ यशवंते यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. नापिकी आणि कर्जाची चिंता भुजंगे यांनी आपल्या पुतण्याला बोलून दाखवली होती.
वसमत तालुक्यातील लिंगी या गावचे रहिवासी असलेले रघुनाथ भुजंग यशवंते हे सुमारे १० ते १२ एकर कोरडवाहू शेतीचे मालक होते. यशवंते यांच्या कोरडवाहू शेतामध्ये यावर्षी अपु-या पावसाने उत्पन्न कमी आले होते. त्याचप्रमाणे एकुण तीन लाख रुपयांचे पिककर्ज दोन बँकांकडून घेतले असल्याने यशवंते चिंतग्रस्त होते. आपली चिंता त्यांनी पुतण्याला बोलून दाखवल्यावर त्याच दिवशी मध्यरात्री त्यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले . या घटनेची हट्टा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.