शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त
By Admin | Updated: July 16, 2017 00:30 IST2017-07-16T00:30:01+5:302017-07-16T00:30:01+5:30
शेती साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध, विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव, जिल्ह्याच्या राजकारणात आलेले चढउतार, कंधार-लोहा मतदारसंघातील विकासकामे आदींबाबत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी ‘लोकमत’ चमूशी बोलताना सविस्तर विचार मांडले.
चिखलीकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर चाणाक्ष मुख्यमंत्री असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात त्यांनी तेलंगवाडी येथे केला होता़ यासंदर्भात चिखलीकर म्हणाले, मी सध्या सेनेत आहे़ ज्या पक्षात मी राहतो़ त्या पक्षाशी पूर्ण इमान ठेवतो़ भाजपामध्ये प्रवेश करणार नाही, लोक काय बोलतात याला काही अर्थ नाही. वस्तुस्थिती मात्र तशी नाही. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २५०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. नांदेडचे अशोकराव चव्हाण हेही मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात मात्र ५ कोटी रुपयेही मिळाले नाहीत़ विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंबोटी धरणासाठी साडेपाच कोटी रुपये दिल्याने धरणाच्या कामाला वेग आला़ तसेच लवकरच ते पूर्णत्वासही जाणार आहे़ ही वस्तुस्थिती आहे, असे आ. चिखलीकर म्हणाले.