शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे-चव्हाण

By admin | Updated: August 26, 2015 00:47 IST

जालना : मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. तात्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे

जालना : मराठवाड्यात दुष्काळी स्थिती गंभीर असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. तात्काळ उपाय योजना करून शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी जालन्यात केली.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अरूण मुगदिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आ. धोंडीराम राठोड, सुरेश जेथलिया, संतोषराव दसपुते, शंकरराव राख, शकुंतला शर्मा, कल्याण काळे, सेवा दलाचे विलास औताडे, आर.आर.खडके, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस विमलताई आगलावे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आयशा खान, डेव्हीड घुमारे प्रभाकर पवार , बाबूराव कुलकर्णी, रवींद्र तौर ज्ञानेश्वर पायगव्हाणे उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले, मराठवाड्यात भयावह स्थिती असून, सरकार मात्र झोपेचे सांग घेत आहे. झोपलेल्याला जागे करणे सोपे असते परंतु झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग कशी आणावी, असा सवाल करुन ते म्हणाले, की आता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. निवडणूक काळात केवळ घोषणांचा पाऊस पाडून हे सरकार सत्तेत आले आहे. सत्तेत आल्यानंतर सर्व घोषणा हवेतच विरल्या आहेत. सर्व आश्वासने कागदावरच असून, याची अमलबजावणी करण्याची भाजपा सरकारची कुठलीही मानसिकता दिसत नसल्याचे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांचा अंत पाहू नका अन्यथा याचा स्फोट होण्यास वेळ लागणार नाही, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला. या सरकारला बहुमताचा पारा चढला असून, सरकारच्या कार्यपद्धतीविरोधात रस्त्यावर उतरण्याचे संकेत चव्हाण यांनी परिषदेत दिले. काँग्रेस आघाडीच्या सरकारने शेतकरी अडचणीत असताना त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे. मात्र, सध्याचे सरकार हे ढिम्म असून, सर्व पातळ्यांवर ते अपयशी ठरले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याचे सांगून बँकांच्या असहकार्यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसनेच सभागृहात सरकारच्या कार्यपद्धतीवर आवाज उठवला नसून सत्तेतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही शेतकऱ्यांचा आवाज मांडला आहे. मात्र, तरीही सरकार जागचे हलायला तयारी नाही. राज्य करण्यासाठी ही मंडळी योग्य नसल्याचे सांगून सरकारचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे खा. चव्हाण म्हणाले. भीमराव डोंगरे म्हणाले की, बँकांच्या असहकार्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, रोहिलागड येथील युनियन बँकेच्या अधिकाऱ्याने एका शेतकऱ्याने केवळ ३५ हजार रुपयांचे कर्ज घेतलेले असताना त्याच्या सातबाऱ्यावर चक्क एक लाख ३५ हजारांचे कर्जाचा बोझा चढविला. डोंगरे यांनी पुरावा म्हणून सातबाराच उपस्थितांना दाखविला. फळबागांचा पीकविमा शेतकऱ्यांना अद्याप न भेटल्याने त्यांनी सरकार व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. तर केवळ राजकीय अकसापोटी जालन्यातील जलवाहिनी अंथरण्याचे १३० कोटी रुपये खर्चाचे मंजूर झालेले काम रद्द करण्यात आले. तसेच विद्यमान आमदार ३०० बंधारे उभारल्याचा दावा करीत असले तरी वखारी येथे एकच बंधारा उभारला असून, तोही आपल्या कार्यकाळातच झाल्याचा दावा माजी आ. गोरंट्याल यांनी केला. यावेळी माजी नगरसेवक गणेश राऊत व धर्मा खिल्लारे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रवींद्र तौर, डेव्हीड घुमारे, कल्याण काळे यांंनी मनोगत व्यक्त केले. यावेळी २ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)