शेतजमिनीचा पोत बिघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:59 IST2017-08-09T23:59:59+5:302017-08-09T23:59:59+5:30
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील जवळपास ७० हजार शेतकºयांच्या शेतातील मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात जमिनीमध्ये लोह, जस्त, नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले

शेतजमिनीचा पोत बिघडला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : २०१५ ते २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील जवळपास ७० हजार शेतकºयांच्या शेतातील मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. यात जमिनीमध्ये लोह, जस्त, नत्र आणि स्फुरदचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जमिनीची सुपिकता तपासणीसाठी केंद्र शासनाने २०१५ पासून विशेष मोहिम राबविली आहे. जिल्ह्यात शेतकºयांची संख्या सव्वापाच लाखांच्या आसपास आहे. त्यापैकी जिल्हा मृद सर्व्हेक्षण मृद चाचणी विभागाने पहिल्या वर्षी २०१५ -१६ या वर्षात २३ हजार १२३ माती नमुन्यांची तपासणी केली. आणि शेतकºयांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले.
२०१६ -१७ या वर्षात ५५ हजार शेतकºयांनी जमिनीची तपासणी केली. यामध्ये आम्लविल्म निर्देशक, क्षारता, आॅरगॅनिक कार्बन, नत्र, पालाश, स्फुरद, तांबे लोह, जस्त, मॅगनिज, बोरॉन, जमिनीतील ओलावा अशा विविध बारा घटकाची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील माती नमुन्याची तपासणी करण्यात आली.
रासायनिक खताचा बेसुमार वापरामुळे जमिनीत प्रामुख्याने जस्त, लोह, स्फुरद या सुक्ष्म मुलद्रव्याचे कमतरता आढळून आली आहे. जमिनीचा पोत सुधारायचे असेल तर जमिनीत शेणखत, गांडूळ, लेंडी खताचा वापर करणे गरजचे आहे़