शेतकरी संपाची धग कायम

By Admin | Updated: June 4, 2017 00:34 IST2017-06-04T00:33:19+5:302017-06-04T00:34:37+5:30

जालना : शेतकरी संपाची धग तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले

The farmers remained in the shadow of the strike | शेतकरी संपाची धग कायम

शेतकरी संपाची धग कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकरी संपाची धग तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात पाहायला मिळाले. परतुरातील दोन्ही आठवडी बाजार बंद ठेवण्यात आल्याने बाजारातील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती. जालना बाजार समितीमधील भाजीमार्केटमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीस आणला नाही. तालुक्यातील रामनगर येथे बैलगाडीसह रास्तारोको करण्यात आला.
जालना बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी सकाळी भाजीपाला विक्रीस आणला नाही. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली.याचा परिणाम भाजीपाल्याच्या भावावरही जाणवला. भाजीबाजारात ऐरवी २५० रुपयांना विकणारे एक कॅरेट आज पाचेश रुपयाला विकले गेले. किरकोळ विक्रेत्यांनी भाजीपाल्याचे दर वाढविल्याचे दिसून आले.परतूरमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात सहभागी होत शेतकरी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. किसान क्रांती मोर्चाच्यावतीने शुक्रवारी या बंदचे आवाहन करण्यात आले होते. परिणामी फळ, भाजीपाला व दुध विक्रे त्यांनी विक्री बंद ठेवत शनिवारी गाव व मोंढा भागातील बाजारात भाजीपाला, दूध विक्रीस आणले नाही. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत गाव व मोंढा भागातील इतर सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. परतूर मोंढा भागात सकाळी ७ वाजताच बाजार भरतो. परिसरातील खेड्यापाड्यांतून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीस येतो. बाजारात दिवसभर प्रचंड गर्दी असते. मात्र, आज ही बाजाराची जागा खेळाचे मोकळे मैदान वाटत होते. एकही भाजीपाला व फळ विके्रता बाजाराकडे फिरकलाच नाही. परतूर गावालगत भरणाऱ्या बाजारात दुपारी तीन वाजेपर्यंत एकही विके्रता नव्हता. संप मागे घेण्यात आल्याच्या चर्चेमुळे दुपारी चारच्या सुमारास शहरातील खेड्यातील काही भाजीपाला विक्रते आले होते. मात्र, गाव भागातील बाजार एक तास भरला.या आठवडी बाजारासाठी खेडयापाडयातून येणारे ग्रामस्थ आज या बाजाराकडे फिरकलेच नाहीत. कडकडीत बंदमुळे शेतक ऱ्यांचा संप यशस्वी होण्याबरोबरच लाखोंची उलाढालही ठप्प झाली. शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत जिल्हा हमाल मापाडी मजदूर युनियनने शनिवारी काम बंद ठेवून शेतकऱ्यांचा संपास पाठिंबा दिला. या संदर्भात युनियच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास युनियचे पदाधिकारी, सदस्य व मजुरांचे समर्थन आहे. त्यामुळे मोंढ्यातील कामकाज सोमवारपर्यंत बंद राहील. शेतात मशागतीची कामे करणाऱ्या पुरुष व महिला शेतकऱ्यांना रोजगारी हमी योजनेतून किमान ५० दिवसाची मजुरी द्यावी, ५८ वर्षे झालेल्या शेतकऱ्यांना महिना पाच हजारांची पेंशन देण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर हसनखाँ पठाण, लक्ष्मण करपे, अकबर सय्यद, हफिजखाँ नन्हेखान, ब्रम्हानंद जागडे, वैजिनाथ भारतीय, विलास केशरी, सुरेश गिरी, विलास हिवाळे, संतोष जगधने, राहुल करपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: The farmers remained in the shadow of the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.