शहरं
Join us  
Trending Stories
1
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
2
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
3
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
4
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
5
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
6
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
7
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
8
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
9
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
10
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
11
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
12
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
13
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
14
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
15
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
16
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
17
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
18
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
19
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
20
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
Daily Top 2Weekly Top 5

शेतात भरली प्रतीसंसद;'खेत की बात'करत प्रधानमंत्र्यांना शेतकऱ्याचे रोखठोक प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 16:55 IST

Farmer asks a questions to PM over 'Khet Ki Baat' : लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीकविमा शेतकरी हिताचा राहिला नाहीइंधन दरवाढ, शेतमालाच्या कमी भावाचा मुद्दा उपस्थित केला.

- तारेख शेख कायगाव (जि. औरंगाबाद) : परिस्थितीला हतबल झालेल्या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 'खेत की बात' करत अनेक सवाल उपस्थित करत आपली व्यथा मांडली. भाऊसाहेब शेळके असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक माग्न्यासुद्धा मांडल्या आहेत. शेतात प्रतीसंसद भरवत प्रधानमंत्री मोदी यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

लोकसभेत खासदार समस्या मांडतात त्याप्रमाणे शेतकऱ्याने फेसबूक लाईव्हद्वारे थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देशून समस्या मांडल्या. मी जे मुद्दे मांडले ते मुद्दे लोकप्रतिनिधींनी संसदेत मांडले पाहिजे. मात्र तसे होत नसल्याने मी स्वतःच शेतात औतासमोर उभे राहून आपली व्यथा मांडली, असे भाऊसाहेब शेळके म्हणाले. शेतात प्रतिसंसद भरवत शेळके यांनी लोकप्रतिनिधी संसदेत बोलतात तसे लोकसभा अध्यक्ष आणि पंतप्रधान यांना उद्देशून आपले प्रश्न मांडले. या २२ मिनिटांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी इंधन दरवाढ, शेतमालाच्या कमी भावाचा मुद्दा उपस्थित केला. 

यासोबतच कृषी कायदे रद्द करा, प्रधानमंत्री पीकविमा शेतकरी हिताचा राहिला नाही, उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान, सहकारी कारखाने बंद होऊन शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने स्वस्तात विकले जात आहे, शेतकऱ्यांशी संबंधित ग्रामीण भागातील रस्ते प्रश्न आदी मुद्दे त्यांनी सविस्तर मांडले. या लाईव्हला ग्रामीण भागातील तरुणांनी चांगलेच डोक्यावर घेतले. या उपक्रमाचे तरुणांनी कौतुक केले. तसेच शेळके यांनी विचारलेले प्रश्न आणि मागण्यांना आपला पाठींबा असल्याचे अनेकांनी कॅमेंट आणि शेअर करत दर्शवले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीAurangabadऔरंगाबाद