शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

गावातील पाण्यावर शासनाचा डल्ला; अनुदानाने नव्हे, तर पाण्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील: पी.साईनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:29 IST

आतापर्यंत सीमेवर लढलेल्या युद्धात जेवढी जीवित हानी झाली त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवन संपविले आहे.

छत्रपती संभाजीनगर : १९९१ मध्ये मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यापासून केंद्र सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी आहेत. शेती परवडत नसल्याने देशातील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांनी शेतीशी नाते तोडले आहे. ग्रामीण भागातील पाण्यावर शासन डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या अनुदानाने नव्हे, तर पाण्याने सुटतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी रविवारी येथे केले.

नेशन फॉर फार्मर्सच्या वतीने रविवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात शेतकरी आत्महत्या, समस्या आणि उपाय या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राचे बीजभाषण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर किसान सभेचे नेते राजन क्षीरसागर, चर्चासत्राचे निमंत्रक तथा बॅकिंग कर्मचारी संघटनेचे नेते देविदास तुळजापूरकर, पत्रकार सुहास सरदेशमुख ,ॲड. विष्णू ढोबळे आणि रंजन दाणी उपस्थित होते. पी. साईनाथ म्हणाले की, बी.टी. बियाण्यांऐवजी स्थानिक बियाणे जास्त चांगले आहे. बीटी बियाणे अळीला रोखू शकत नाही, हे निष्पन्न झाले आहे. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या माथी बीटी बियाणेच मारते. २००१ मध्ये प्रति व्यक्ती ५१७७ घ.मी. पाणी उपलब्ध होते. २०२५ मध्ये केवळ ११४० क्युबिक मीटर पाणी मिळत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या अधिक असताना त्यांच्यासाठी कोणतेही धोरण सरकारकडे नाही.

मुंबईतील बांद्र्यात ३५ वर्षांत एक दिवसही पाण्याचा खंड नाहीमुंबईतील बांद्र्यातील आपण रहिवासी आहोत. मागील ३५ वर्षांच्या काळात बांद्र्यात एक दिवसही नळाच्या पाण्याचा खंड नाही. हे पाणी ज्या आदिवासी भागातील पाच तलावांतून येते, त्या आदिवासींना मात्र नळाचे पाणी नसल्याचे पी. साईनाथ यांनी सांगितले.

केंद्र सरकारचे शेतकऱ्यांविरोधात आर्थिक युद्धआतापर्यंत सीमेवर लढलेल्या युद्धात जेवढी जीवित हानी झाली त्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जीवन संपविले आहे. सरकारने शेतकऱ्यांविरोधात एकप्रकारे आर्थिक युद्धच पुकारले असल्याचा आरोप किसान नेता राजन क्षीरसागर यांनी केला.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर