कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: August 7, 2015 01:13 IST2015-08-07T01:02:02+5:302015-08-07T01:13:25+5:30
जालना : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
जालना : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सतत तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना नापिकीला सामोरे जावे लागत आहे. सरकाचे या प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, शेतकऱ्यांचे मागील तीन वर्षांपासूनचे थकलेल्या कर्जाचे पुनर्गठण करावे, या वर्षी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आला.
या आंदोलनात शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब कदम, केशवराव मदन, बाबूराव गोल्डे,, पुंजाराम सुरुंग, रमेश
खाडेभराड, गजानन भांडवले, माधवराव जाधव, केदारनाथ तांगड, सोपानराव खांडेभराड, विश्वनाथ शिंदे, भीमराव खांडेभराड, मनोज कावळे,
तात्याराव भानुसे, अप्पा
चोखनफळे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत.