शेततळ्यांचा आदेश कागदावरच
By Admin | Updated: September 15, 2015 00:36 IST2015-09-15T00:08:27+5:302015-09-15T00:36:18+5:30
औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर

शेततळ्यांचा आदेश कागदावरच
औरंगाबाद : शेततळ्यांचे नियोजन अजून कागदावरच आहे. मुख्यमंत्र्यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन वर्षांपासून बंद पडलेली शेततळ्यांची योजना पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले. परंतु अजून त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. येणाऱ्या मंत्रिमंडळात निर्णय होण्याची शक्यता आहे.
शेततळ्यांमध्ये गैरव्यवहार होण्याच्या तक्रारींवरून ती योजना बंद करण्यात आली होती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्णरीत्या पाण्याचा स्रोत साठवणुकीच्या माध्यमातून मिळावा. यासाठी शेततळी ही संकल्पना पुढे आली. परंतु मागील काही वर्षांमध्ये त्या योजनेत कागदोपत्रीच शेततळी बांधण्याचे प्रकरण पुढे येऊ लागले. विभागीय पातळीवर दीड ते दोन शेततळ्यांसाठी अनुदानाचा उपक्रम राबविण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी घोषित केला असला तरी त्यासाठी पारदर्शकता महत्त्वाची ठरणार आहे.
मराठवाड्यात यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पिके जगविणे अवघड झाले आहे. त्या भागांत शेततळी बांधण्याचा प्राधान्याने विचार होणार आहे.