हवामान आधारित पिकविमा भरण्याच्या प्रक्रियेने शेतकरी संभ्रमात!
By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:13:16+5:302014-06-30T00:38:01+5:30
वलांडी : हवामान आधारीत पीक विमा योजनेसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरा झाला नसला तरी पीक विमा भरावा, असे स्पष्ट निर्देश अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि़ने दिले

हवामान आधारित पिकविमा भरण्याच्या प्रक्रियेने शेतकरी संभ्रमात!
वलांडी : हवामान आधारीत पीक विमा योजनेसाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरा झाला नसला तरी पीक विमा भरावा, असे स्पष्ट निर्देश अग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी आॅफ इंडिया लि़ने दिले असले तरी ही योजाना कर्जदार शेतकऱ्यासाठी लागू आहे का? हा प्रश्न बँकेने उपस्थित केलेल्या कर्जदार शेतकऱ्यासाठी लागू आहे का? हा प्रश्न बँकेने उपस्थित केलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरण्याची गरज नसल्याचे सांगत असल्याने शेतकरी विम्याबाबत संभ्रम अवस्थेत अडकला आहे़
शेतकरी सभासद हा शेतातील एका पिकावर कर्ज काहि क्षेत्रावर घेतो़ व उर्वरीत क्षेत्रात दुसरे पिके घेतात मात्र हवामान सुधारीत पिक विमा योजने अंतगर्गत ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकाचा लाभ लातूर जिल्ह्यासाठी बजाज अलाईन्स जनरल इन्शुरन्स कं ़लि़समावेश केला आहे़
शिवाय विमा भरण्याच्या फार्मवर बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी विमा योजना असा स्पष्ट उल्लेख असल्याने कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत काय? असा सूर कर्जदार शेतकऱ्यातून येतो़ शिवाय बहुतांश शेतकरी हे सोसायटीचे कर्जदार असून हे वंचित राहणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतो़ याबाबत संबधित विभागाने योग्य तो खुलासा करावा व शेतकऱ्यांची अडचण दुर करावी अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर)
वलांडी येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता आजच परिपत्रक आले असून शेतकऱ्यांच्या सातबारावरील पीकपेरा नोंदीवरून कर्जाच्या नावे टाकून इन्शुरन्स कंपनीला विमा भरला जाणार आहे़ मात्र त्यासाठी चालू बाकीदार असणे गरजेचे असल्याचे सांगितले़