समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:04 IST2020-12-25T04:04:51+5:302020-12-25T04:04:51+5:30

नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गासाठी शेती अधिग्रहण करण्याच्या वेळी अनंतपूर शिवारातील शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांसह समृद्धी महामार्गाचे अधिकारी, कर्मचारी वारंवार शेतकऱ्यांना सांगत ...

Farmers have no road due to Samrudhi Highway | समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना रस्ताच नाही

समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना रस्ताच नाही

नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गासाठी शेती अधिग्रहण करण्याच्या वेळी अनंतपूर शिवारातील शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांसह समृद्धी महामार्गाचे अधिकारी, कर्मचारी वारंवार शेतकऱ्यांना सांगत होते की, समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी साईट रस्ता सोडला जाईल. मात्र, समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. तर महामार्गाच्या अधिग्रहित जागेवर दोन्ही बाजूने भिंती बांधण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूने असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहन कसे घेऊन जावे, अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. काही खोट्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांची शेती पडीक पडणार आहे, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन व समृद्धी महामार्गाच्या संबंधित विभागाने दखल घेऊन समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनीवर दोन्ही बाजूने साईट रस्ते करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Farmers have no road due to Samrudhi Highway