पावसाच्या आगमनाने घाटनांद्रा परिसरातील शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:05 IST2021-06-18T04:05:26+5:302021-06-18T04:05:26+5:30
घाटनांद्रा परिसरातील चारनेर, धारला, पेंडगाव भागात आठ दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या ...

पावसाच्या आगमनाने घाटनांद्रा परिसरातील शेतकरी सुखावला
घाटनांद्रा परिसरातील चारनेर, धारला, पेंडगाव भागात आठ दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता. या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे परिसरातील ८० टक्के शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाच्या भरवशावर मका, कपाशी, भुईमूग, सोयाबीन, अद्रक, आदी पिकांची लागवड केली. त्यानंतर सलग आठ दिवस पाऊसच न आल्याने कोवळे अंकुर बीज वाया जाण्याची भीती निर्माण झाली. दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. तोच मंगळवारी आणि बुधवारी सायंकाळी दीड ते दोन तास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यांच्या जिवात जीव आला असून, पेरण्या बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे सुरू केली आहेत.