शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग

By admin | Updated: April 23, 2016 01:25 IST

कचनेर : गेल्या चार-पाच वर्षांच्या दुष्काळात सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत.

कचनेर : गेल्या चार-पाच वर्षांच्या दुष्काळात सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत. त्यात सरकारने फळबागांना काहीही मदत न करण्याचे धोरण ठरविल्याने निराशेने आतल्या आत आक्रंदणाऱ्या शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी (दि.२२) पैठण तालुक्यातील पोरगाव चौफुली येथे दिसून आला. पाण्याअभावी जळून सरपण झालेली ३५० झाडांची मोसंबीची बाग शेतकऱ्यांनी स्वत:च्या हातांनी पेटऊन देत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नव्या सरकारने फळबागा वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. आघाडी सरकारने केलेल्या मदतीमुळे गेली तीन-चार वर्षे कशाबशा वाचलेल्या हजारो एकर बागा आता पाण्याअभावी जळून जात आहेत. फळबाग वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी करूनसुद्धा सरकारने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात आक्रोश असून या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पोरगाव चौफुलीजवळील गट नंबर ५८ मध्ये किसन रावसाहेब गायकवाड यांच्या शेतातील मोसंबीची ३५० झाडे जाळून तीव्र निषेध केला. गायकवाड यांच्याकडे बागेत मोसंबीची ४५०० झाडे आहेत. पाण्याअभावी ही झाडे सुकत असून सुकलेली ३५० झाडे आजच्या आंदोलनात जाळून टाकण्यात आली. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास संघटनेचे सर्व कार्यकर्ते व शेतकरी मोसंबीच्या बागेत जमा झाले. काट्याकुट्या जमा करून मोसंबीच्या झाडांची होळी करण्यात आली. धुराचे लोट गगनापर्यंत भिडले.त्यामुळे परिसरात सर्वत्र धूरच धूर दिसत होता. झाडे पेटविताना शेतकरी किसन गायकवाड यांचे डोळे भरून आले व त्यांना हुंदके अनावर झाले. कडाक्याचे ऊन आणि सोसाट्याच्या वाऱ्याने क्षणार्धात आग पेटली व दहा-पंधरा मिनिटात बागेचे अवशेष राखेत बदलले.राज्यात मोसंबीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील शेकडो एकर मोसंबी बागांचे सरपण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मुला-मुलींचे लग्न कसे होणार, शिक्षणाचा खर्च, बँकेचे कर्ज कसे फेडावे, गृहखर्च कसा चालवावा असे नाना प्रश्न उपस्थित होत असल्याने शेतकऱ्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. याप्रसंगी ताराचंद (किसन) गायकवाड, शिवा गायकवाड, डोणगावचे सरपंच सुनील तांबे, प्रभाकर नीळ, गोरख नीळ, कचरू नीळ, अतुल चव्हाण, शंकर नीळ, रामनाथ राठोड व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.करावं तरी काय, आम्ही हतबल झालोय...लेकरापेक्षाही अधिक जीव आम्ही या बागांना लावला. लेकरांच्या तोंडातील घास काढून बागा वाढविल्या. माझी बाग लावून केवळ १० वर्षे झाली, अजून किमान ती १० वर्षे जगली असती. मागील चार वर्षे दुष्काळ व सततची पाणीटंचाई, त्यामुळे बेताचेच उत्पादन झाले. उत्पादन खर्चही भागला नाही. डोक्यावरील कर्ज वाढते आहे. दररोज सरपण होत जाणारी बाग पाहून तीळतीळ मरण्यापेक्षा टाकली एकदाची जाळून. एक दिवस रडून गप्प बसता येईल. -किसन गायकवाड, शेतकरी कधी येणार पंतप्रधानांचे पथकअन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथक पाठविण्याची घोषणा करून पंधरा दिवस उलटले आहेत; परंतु अद्यापही पथक आले नाही. हे पथक कधी येणार? सरकारला माहिती कधी सादर करणार? तोपर्यंत या फळबागा वाचतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. सरकारने तातडीने दुष्काळ निवारण्यासाठी पावले उचलावीत आणि शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी, फळबागा वाचविण्यासाठी उपाययोजना करावी, अशी आमची मागणी आहे. जागवल्या जुन्या स्मृती मराठवाड्यातील मोसंबीच्या बागा जगविण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारातील केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जालना-औरंगाबाद व मराठवाड्यातील जिल्ह्यात दौरा काढून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. फळबागांची प्रत्यक्ष पाहणी करून हेक्टरी ३० हजार रुपयांची, मर्यादित दोन हेक्टरपर्यंत मदत केली होती. त्यामुळे २५ ते ३० टक्के बागा जगू शकल्या. शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घातले. ज्यांना पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी ठिबक पद्धतीने पाणी देऊन बागा वाचविल्या.