शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व फळविक्री केंद्र सुरू
By Admin | Updated: November 28, 2014 01:16 IST2014-11-28T00:57:00+5:302014-11-28T01:16:58+5:30
औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा

शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व फळविक्री केंद्र सुरू
औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट शहरी ग्राहकांपर्यंत जावा, असा संकल्प असल्याचे जिल्हा
कृषी अधीक्षक पंडित लोणारे
म्हणाले.
केंद्राचे उद्घाटन भाजीपाला पुरवठा प्रकल्पाचे राज्य सल्लागार भगवान कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी भोसले, कृषी विकास अधिकारी कोलते, आत्माचे उपसंचालक शिरडकर, तहसीलदार विजय राऊत यांची उपस्थिती होती.
या प्रकल्पांतर्गत शेतकरी मंडळाने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे वेगवेगळ्या वसाहतींमध्ये जाऊन विक्री करण्यापेक्षा एकाच ठिकाणी सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध ठेवला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी-ग्राहक असाच व्यवसाय वाढीस लागेल. त्यामुळे दलाल नाहीसे होऊन शेतकऱ्यांना योग्य भाव हाती अन् ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा हाच कृषी विभागाचा उद्देश आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिकविलेला भाजीपाला व फळे मिळणार आहेत.
शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला थेट मिळणार असल्याने तो स्वस्त दरात व चांगल्या दर्जाचा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.४
जय बाबाजी मंडळ, पळशी, हरसिद्धी माता शेतकरी मंडळ, ओहर यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला दररोज उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मॉल्सच्या बाजूलाच हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांना वेगळे मार्केट निर्माण करून दिल्याने शेतकरीही उत्साहाने तयार झाले आहेत. ४
नागरी वसाहतीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट फळे व भाजीपाला पुरवठा प्रकल्प सुरू करावयचा असेल त्यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे, ‘आत्मा’च्या जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी सहायक शिवानंद आडे यांनी सांगितले.