‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब सोडले वाऱ्यावर

By Admin | Updated: March 31, 2015 00:35 IST2015-03-30T23:59:01+5:302015-03-31T00:35:54+5:30

तळणी : उस्वद (ता. मंठा) येथील युवक शेतकरी राजेश दत्तराव सरोदे (वय ३४) या शेतकऱ्याने २६ मार्च रोजी रात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

'The farmer's family left the wind | ‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब सोडले वाऱ्यावर

‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब सोडले वाऱ्यावर


तळणी : उस्वद (ता. मंठा) येथील युवक शेतकरी राजेश दत्तराव सरोदे (वय ३४) या शेतकऱ्याने २६ मार्च रोजी रात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सततच्या नापिकीला कंटाळून व बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याच्या नैराश्येतून सरोदे यांनी आपला जीवन प्रवास संपविला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मात्र, शेतकरी आत्महत्येच्या चार दिवसानंतरही कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी या कुटुंबियांची साधी भेट घेऊन सांत्वनही केले नाही.
उस्वद येथे माळरान शिवारात सरोदे यांना ६ एक र शेती होती. जमिन हलक ी असुन मागील दोन वर्षांपासून दुष्काळ अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतात उत्पन्न कमी अन् खर्च जास्त झाला होता. याशिवाय तळणी व मंठा येथील बँकांकडे वारंवार पीक कर्जासाठी विनंती के ली. मात्र, निराशा पदरी आली. त्यामुळे संसाराचा गाडा आणि शेतीचा खर्च भागविणे अवघड होऊ न बसले. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. ही घटना दि. २७ मार्च रोजी सकाळी उघडक ीस आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सी. एम. चरभरे, बीट जमादार पाटील व तलाठी नितीन च्ािंचोले यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला.
मंठा येथे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद मंठा ठाण्यात घेण्यात आली. सरोदे हे कुटुंबातील एकमेव कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार आले.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मात्र, शेतक री आत्महत्येच्या घटनेनंतर चौथ्या दिवस उलटल्यानंतरही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांपैकी कुणीही साधी भेट दिली नाही. (वार्ताहर)

Web Title: 'The farmer's family left the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.